सुमारे ३४ रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण

By admin | Published: August 14, 2015 10:54 PM2015-08-14T22:54:12+5:302015-08-14T22:54:12+5:30

पुणे : सुधारीत भाडेदरानुसार रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत शुक्रवारी संपली. या मुदतीत सुमारे ३४ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. अजूनही सुमारे ४ हजार रिक्षांचे प्रमाणीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे त्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी रिक्षा पंचायतचे निमंत्रक नितीन पवार यांनी केली आहे.

Certification of around 34 RMM | सुमारे ३४ रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण

सुमारे ३४ रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण

Next
णे : सुधारीत भाडेदरानुसार रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत शुक्रवारी संपली. या मुदतीत सुमारे ३४ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. अजूनही सुमारे ४ हजार रिक्षांचे प्रमाणीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे त्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी रिक्षा पंचायतचे निमंत्रक नितीन पवार यांनी केली आहे.
रिक्षा भाडेवाढ लागू होण्यासाठी प्रत्येक रिक्षाच्या मीटरचे प्रमाणीकरण करण्यासाठी दि. १ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. प्रमाणीकरणाशिवाय संबंधित रिक्षा चालकांना भाडेवाढ लागू होणार नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रमाणीकरणासाठी दररोज लांबच लांब रांगा लागत होत्या. वैधमापन विभागाने पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सहा ठिकाणी प्रमाणीकरणाची यंत्रणा उभारली होती. या कालावधीत सुमारे ३४ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण, परवाना नुतणीकरण मुदतीत पुर्ण न करणारे वगळल्यास सुमारे चार हजार रिक्षांचेच प्रमाणीकरण राहिले आहे. या रिक्षांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, असी मागणी पवार यांनी आरटीओ जितेंद पाटील व वैधमापन विभागाचे उप नियंत्रक ध. ल. कोवे यांच्याकडे केली आहे.
-------

Web Title: Certification of around 34 RMM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.