केवळ ४० हजार जमवा अन् परदेशात सुट्टी एन्जॉय करा; 'या' ६ देशात करू शकता पर्यटन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:07 PM2022-04-19T16:07:26+5:302022-04-19T16:07:54+5:30

सुट्टीनिमित्त बाहेर फिरण्यासाठी प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी ही फायदेशीर बातमी आहे.

Consider 6 countries for traveling abroad in low budget under 40000 from india | केवळ ४० हजार जमवा अन् परदेशात सुट्टी एन्जॉय करा; 'या' ६ देशात करू शकता पर्यटन

केवळ ४० हजार जमवा अन् परदेशात सुट्टी एन्जॉय करा; 'या' ६ देशात करू शकता पर्यटन

googlenewsNext

उन्हाळ्याची सुट्टी आली आणि कुठेतरी फिरण्याचा प्लॅन बनवण्याचा विचार करताय? परंतु पैशांच्या टेन्शनमुळे इच्छा असूनही जाता येत नाही. मग आम्ही तुम्हाला अशा देशांची यादी सांगतो जिथे तुम्ही अवघ्या ४० रुपयांत परदेश दौरा पूर्ण करू शकता. परंतु तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ज्यात पैसे वाचवण्यासाठी कुठल्या हॉटेलमध्ये थांबायचं? कुठे जेवण करायचं? कशाप्रकारे तेथील देशात फिरण्यासाठी प्रवासाचं नियोजन करायचं? हे सर्व जाणून घेऊया.

थायलंड(Thailand)

जेव्हा परदेशी प्रवासाचा विषय येतो आणि थायलंडबद्दल बोलायचं हे कसं होऊ शकतं. हे ठिकाण सुंदर असण्यासोबतच स्वस्त देखील आहे, त्यामुळे हे ठिकाण भारतीयांची पहिली पसंती आहे. येथील नाईट लाइफ लोकांना खूप आवडते. एकामागून एक चविष्ट खाद्यपदार्थ इथे येणाऱ्या पर्यटकांची मने जिंकतात. थायलंडमध्ये जगातील काही सर्वोत्तम समुद्रकिनारे आहेत जिथे तुम्ही शांततेचे काही क्षण घालवू शकता. हे ठिकाण परदेशात जाण्यासाठी अधिक किफायतशीर आहे.

राऊंड ट्रिपचा खर्च: दिल्ली आणि मुंबई पासून अंदाजे रु. १७,०००

हॉटेल: प्रति रात्र किमान ५०० रु.

भूतान(Bhutan)

पूर्व हिमालयाच्या दक्षिणेकडील पठारावर वसलेले, भूतान हे ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक पर्यटन आकर्षणांनी वेढलेले एक छोटे शहर आहे. भव्य पर्वत, दाट दऱ्या आणि जंगले असलेल्या भूतानमध्ये तुमचे मनोरंजन करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. जर तुम्हाला साहस आवडत असेल तर थंडर ड्रॅगनच्या भूमीला नक्की भेट द्या. भूतान स्वस्त डेस्टिनेशनसाठीही खूप प्रसिद्ध आहे.

राऊंड ट्रिपचा खर्च: दिल्ली आणि मुंबई येथून सुमारे १६००० रुपये

हॉटेल: अतिथीगृह रु.५००/रात्री

इंडोनेशिया(Indonesia)

दक्षिण पूर्व आशियामध्ये देखील पाहण्यासारखे बरेच काही आहे, येथे प्रत्येक ठिकाण अगदी परवडणारे आहे आणि इंडोनेशिया शीर्षस्थानी आहे. हजारो ज्वालामुखी बेटांनी बनलेले हे ठिकाण तेथील सांस्कृतिक गोष्टींसाठी ओळखले जाते. येथील जकार्ता शहर सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, बाजारपेठा आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण अगदी पॉकेट फ्रेंडली आहे.

राऊंड ट्रिपचा खर्च: दिल्ली, मुंबई पासून सुमारे २५००० रुपये

राहण्याचा खर्च: किमान रु. ५००/रात्र.

व्हिएतनाम(Vietnam)

व्हिएतनाम भारत हे चीनी दरम्यानचं आणखी एक पर्यटन स्थळ आहे, जे बजेटमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी परवडणारे आहे. ऐतिहासिक वास्तू, नैसर्गिक सौंदर्य, निर्मळ समुद्रकिनारे आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ असलेले हे ठिकाण एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. व्हिएतनाममध्ये बरीच मंदिरे, पॅगोडा आणि इतर पवित्र ठिकाणे आहेत. पैसे वाचवण्यासाठी तुम्ही स्ट्रीट फूड खाण्याचा आनंद घेऊ शकता.

राऊंड ट्रिपचा खर्च: दिल्ली, मुंबईपासून सुमारे १८००० रुपये

राहण्याचा खर्च: वसतिगृहाची किंमत किमान ४०० रुपये असेल

सिंगापूर(Singapore)

सिंगापूर ऐकायला तुम्हाला थोडं महाग पडेल, पण तुम्ही इथे ४० हजारात फिरू शकता. अनेक सुंदर पर्यटन स्थळांनी वेढलेले, सिंगापूर त्याच्या ट्रेंडी खरेदीसाठी देखील ओळखले जाते. येथे तुम्ही महागड्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याऐवजी रस्त्यावरील खाद्यपदार्थांकडे वळू शकता. मनोरंजनासाठी येथील नाइटलाइफ खूपच मनोरंजक आहे. येथे तुम्ही समुद्रकिनारा आणि वन्यजीवांना भेट देण्याची योजना करू शकता.

राऊंड ट्रिपचा खर्च: दिल्ली, मुंबईपासून सुमारे १८००० रुपये

राहण्याची सोय: किंमत किमान 400 रुपये असेल

यूएई (UAE)

उंच टॉवर्ससाठी प्रसिद्ध, संयुक्त अरब अमिराती त्याच्या लक्झरी लाइफसाठी प्रसिद्ध आहे. येथे करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही तुमच्या प्रवासाच्या यादीत जोडू शकता. त्‍याची अनेक शहरे नेत्रदीपक गगनचुंबी इमारतींसह लोकांची मने जिंकून घेतात. जर तुम्हाला खरेदी करायची नसेल तर तुम्ही इथे फक्त फिरण्यासाठी जाऊ शकता. बाजारातील अनोख्या आणि पुरातन गोष्टी पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत कराल. येथे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वस्तात जाण्यासाठी बसचा वापर करू शकता.

राऊंड ट्रिपचा खर्च: दिल्ली आणि मुंबई येथून सुमारे १२००० रुपये.

राहण्याची सोय: हॉटेलमध्ये किमान रु. २,०००/रात्र.

Web Title: Consider 6 countries for traveling abroad in low budget under 40000 from india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.