रिलेशनशिपबाबत असुरक्षितता वाटणारे कपल्स सोशल मीडियात करतात 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 12:02 PM2019-07-02T12:02:45+5:302019-07-02T12:06:27+5:30

सोशल मीडिया आता लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून लोक त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटी अपडेट करतात.

Couples who take too many selfies are headed for a break up | रिलेशनशिपबाबत असुरक्षितता वाटणारे कपल्स सोशल मीडियात करतात 'हे' काम!

रिलेशनशिपबाबत असुरक्षितता वाटणारे कपल्स सोशल मीडियात करतात 'हे' काम!

Next

सोशल मीडिया आता लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून लोक त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटी अपडेट करतात. एखादा आनंदाचा क्षण असो वा दु:खाचा थेट सोशल मीडियावर शेअर केला जातो. असं करणाऱ्या लोकांना खासकरून कपल्सबाबत रिलेशनशिप तज्ज्ञांनी एक निष्कर्ष काढला आहे.

msn.com ने दिलेल्या रिपोर्टमध्ये सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर निक्की गोल्डस्टेइन यांच्यानुसार, सोशल मीडियावर आपला किंवा आपल्या पार्टनरचा सेल्फी सतत पोस्ट करणाऱ्या कपल्समध्ये जसं दिसतं तसं सगळंकाही ठीक सुरू नसतं. या कपल्सचं रिलेशनशिप दुसऱ्या कपल्सप्रमाणे सामान्य नसतं.

तुम्ही पाहिलं असेल की, काही कपल्स असे असतात जे त्यांच्या रिलेशनशिपचा सोशल मीडियात दिखावा करत नाहीत. प्रत्येकवेळी सेल्फी घेऊन फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर शेअर करणं त्यांना योग्य वाटत नाही. त्यांच्यासाठी तो क्षण जगणं आणि तो क्षण फोटोच्या रूपाने जवळ ठेवणं अधिक महत्वाचं असतं.  

निक्की गोल्डस्टेइन यांनी एका वेबसाईटला सांगितले की, ज्या कपल्समध्ये त्यांच्या रिलेशनशिपबाबत असुरक्षिततेची भावना असते. ते सोशल मीडियावर जास्त दिखावा करतात. ते जास्तीत जास्त फोटो आणि सेल्फी पोस्ट करून नात्याला मान्यता देण्याचा प्रयत्न करत असतात. समाजाने त्यांचं नातं स्विकार करावं असं त्यांना वाटत असतं. 

त्यांनी पुढे असेही सांगितले की, प्रत्येक क्षणाचा फोटो सोशल मीडियात शेअर करण्यामागे या लोकांची ही मानसिकता असते की, त्यांच्यात सगळंकाही ठिक आणि सुरळीत सुरू आहे. पण आतून त्यांना त्यांच्या नात्याबाबत काहीना काही भीती असते किंवा त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. याचा परिणाम म्हणजे पुढे जाऊन ब्रेकअप होऊ शकतं.

यातून निष्कर्ष निघतो की, सोशल मीडियावर दाखवले गेलेले फोटो खरे नसतात. सोबतच जे कपल सोशल मीडियावर असं काही करत नाहीत त्यांची आनंदी असण्याची शक्यता वाढते.
 

Web Title: Couples who take too many selfies are headed for a break up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.