हार्बरवरील डीसी लोकल डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:39+5:302015-09-07T23:27:39+5:30

हार्बरवरील डीसी लोकल डोकेदुखी

DC local headaches on the Harbor | हार्बरवरील डीसी लोकल डोकेदुखी

हार्बरवरील डीसी लोकल डोकेदुखी

Next
र्बरवरील डीसी लोकल डोकेदुखी
मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची कबुली
मुंबई - मध्य रेल्वेवरील मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवर एसी परावर्तनाच्या लोकल धावत असतानाच हार्बरवरील डीसी परावर्तनाच्या लोकल डोकेदुखी ठरत असल्याची कबुली विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली. लवकरच परावर्तन होणे गरजेचे असून त्यामुळे नवीन एसी परावर्तनाच्या लोकल धावतील आणि तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागणार नसल्याचे ते म्हणाले.
हार्बर मार्गावरील चुनाभट्टी येथे वाशी-सीएसटी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि दोन तास सेवा विस्कळीत झाली. सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने कामावर जाणार्‍यांचे मात्र चांगलेच हाल झाले. तांत्रिक बिघाड झालेली लोकल ही डीसी परावर्तनाची तब्बल २0 वर्षापूर्वीची असल्याचे समोर आले. हार्बर मार्गावर धावणार्‍या डीसी परावर्तनाच्या लोकलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने हार्बरवासियांना सातत्याने मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहे. त्यामुळे नविन लोकल आल्याशिवाय ही समस्या सुटणे शक्य नसल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सध्याच्या घडीला ३५ लोकल धावत असून या डीसी (डायरेक्ट करंट) परावर्तनाच्या लोकल आहेत. या मार्गावर २0१६ च्या मार्च महिन्यापर्यंत डीसी (१,५00 अल्टरनेट करंट) ते एसी परावर्तनाचे (२५,000 अल्टरनेट करंट) काम पूर्ण केले जाणार आहे. हे काम पूर्ण केल्यानंतरच नविन एसी परावर्तनाच्या लोकल हार्बरवर धावतील आणि समस्या सुटेल, अशी माहीती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली. हार्बरवरील डीसी लोकल या हार्बरवासियांसाठी सध्या डोकेदुखीच ठरत असल्याची कबुली त्यांनी दिली.
.............................

एमआरव्हीसीकडून ७२ नव्या बम्बार्डियर लोकलपैकी ३ लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आल्या आहेत. या सर्व लोकल पश्चिम रेल्वेवर येणार असून त्याबदल्यात पश्चिम रेल्वेवरील सिमेन्स लोकल मध्य रेल्वेला देण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाईनबरोबरच हार्बरवरही सिमेन्स कंपनीच्या लोकल येतील.

Web Title: DC local headaches on the Harbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.