फिरायला जाताय मग स्मार्ट फोनचा संन्यास पाळा. सहलीचा आनंद घेण्यासाठी डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग करून पाहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 06:12 PM2017-08-03T18:12:00+5:302017-08-03T18:23:22+5:30

सहलीला केवळ स्वत:बरोबर वेळ घालवत निवांत प्रवास करण्यासाठी एक नवीन गोष्ट ट्राय करून पाहा. डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग करून पाहा. आपला स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप घरीच ठेवून द्या.

Digital Detox is proper option for experience of real enjyoment of an outing | फिरायला जाताय मग स्मार्ट फोनचा संन्यास पाळा. सहलीचा आनंद घेण्यासाठी डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग करून पाहा!

फिरायला जाताय मग स्मार्ट फोनचा संन्यास पाळा. सहलीचा आनंद घेण्यासाठी डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग करून पाहा!

Next
ठळक मुद्दे* आपल डिजिटल डिपेन्डन्स कमी करायला किंवा स्मार्टफोन वापरण्यावर योग्य ते नियंत्रण मिळवायला तुम्हाला तुमचा प्रवास मदत करु शकतो.* स्मार्टफोनशिवाय राहणं हे स्ट्रगलपेक्षा कमी नाही. पण प्रवासाच्या निमित्तानं हे पण शिकून घ्या.* आपण नेहमी करत नाही किंवा करु शकत नाही अशा गोष्टींसाठीच तर आपण प्रवास करत असतो. त्यामुळे प्रवासात डिजटल डिटॉक्सचाही प्रयोग करु न पाहा.



- अमृता कदम


प्रवासाला आपण निघतो ते आपलं काम, कामातले आणि आयुष्यातले ताणतणाव, रोजचं तेच ते आयुष्य मागे ठेवून स्वत:ला वेळ देता यावा, आराम करता यावा म्हणून. पण तरीही हे सगळं आपण सोबत वागवत नेतोच. कारण आपल्यासोबत असलेला आपला स्मार्टफोन, टॅब किंवा आपला लॅपटॉप. हे घरी सोडायला आपण विसरत नाही आणि त्यामुळेच फिरण्यातून जी अनुभूती आणि आनंद मिळायला हवा तो कदाचित आपल्याला मिळत नाही. म्हणूनच केवळ स्वत:बरोबर वेळ घालवत निवांत प्रवास करण्यासाठी एक नवीन गोष्ट ट्राय करून पाहा. डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग करून पाहा.
आपल डिजिटल डिपेन्डन्स कमी करायला किंवा स्मार्टफोन वापरण्यावर योग्य ते नियंत्रण मिळवायला तुम्हाला तुमचा प्रवास मदत करु शकतो. प्रवासावरून घरी आल्यावरही सतत फोन वापरत राहाण्याची पूर्वीची सवयही त्यातून नक्कीच कमी होइल.


 

डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी
 

तुमचा स्मार्टफोन घरीच ठेवा

कदाचित तुम्हाला हे ऐकायला खूप विचित्र वाटेल. कारण सध्याच्या काळात मोबाइलशिवाय राहणं जवळपास अशक्य आहे. लांबच्या प्रवासाला जाताना संपर्कासाठी मोबाईल हवाच. अशावेळी प्रवासाला जाताना स्मार्टफोनऐवजी साधाच फोन घेऊन गेलात तर? फोन करण्यासाठी किंवा आलेले फोन घेण्यासाठी तसंच मेसेज पाठवण्यापुरता वापरता येईल असा छोटा ‘ओल्ड फॅशन्ड’ फोन सोबत असू द्यावा. मोठी स्क्र ीन, व्हॉट्सअ‍ॅप, अमक्या मेगापिक्सेलचा कॅमेरा, त्यात सतत सेल्फी काढण्याची आणि सोशल नेटवर्किंंग साइटवर अपलोड करण्याची घाई असं काही होणारच नाही. तुम्ही फक्त निवांतपणे फिरण्याचा आनंद घेऊ शकाल आणि प्रवासात या साध्या फोनचा अजून एक फायदा म्हणजे हा फोन सोबत बाळगायलाही एकदम सोपा असतो.
 

फोनवरच स्वत:चं अवलंबित्व कमी करा

स्मार्टफोनशिवाय राहणं हे स्ट्रगलपेक्षा कमी नाही. पण प्रवासाच्या निमित्तानं हे पण शिकून घ्या. सुरूवात सकाळी उठल्याबरोबर फोन हातात घेऊन चेक करण्यापासून करा.. आजकाल फोनमध्येच अलार्म असल्यानं फोन उशाशीच असतो. आणि उठल्यानंतरही पहिलं दर्शन फोनचंच होतं. त्यामुळे सगळ्यांत आधी फोनचा अलार्म बंद करा. प्रवासात फिरण्यासाठी लवकर उठावं लागतं. म्हणून तुम्ही रात्रीच हॉटेल रिसेप्शनजवळ सकाळी तुम्हाला किती वाजता उठायचंय हे सांगून वेक-अप कॉल करायला सांगा. परत आल्यावर मोबाइलशिवाय उठण्याची सवय कायम ठेवायची असेल, तर रेडिओ अलार्म क्लॉक घ्यायला हरकत नाही.
तुम्हाला स्मार्टफोनशिवाय अगदीच राहावत नसेल तर तुम्ही अजून एक गोष्ट करु शकता. प्रवासाल जाताना तुम्ही फोनमधले तुम्हाला गरज नसलेलेअ‍ॅप डिलिट करून टाका. शिवाय तुम्हाला सतत येणारे जे नोटिफिकेशन्स असतात तेही तुम्ही बंद करु न ठेवू शकता. त्यामुळे सतत फोन चेक करण्यात जो तुमचा वेळ जातो, तो कमी होईल. ई-मेलचंही नोटिफिकेशन्स बंद करु न ठेवा. म्हणजे तुम्ही जेव्हा स्वत:हून तुमचे मेल पाहायला जाल तेव्हाच तुम्हाला अपडेट्स मिळतील आणि तुम्ही तुमच्या कामाच्या जगातून बाहेर राहाल.

 

डेटा रोमिंग बंद करा

तुम्ही जर दुसर्या राज्यात किंवा परदेशात जात असाल तर फोनमधला डेटा रोमिंगचा पर्याय बंदच करून ठेवा. जेव्हा तुम्हाला वाय-फायची सुविधा उपलब्ध असेल तेव्हाच नेटचा वापर करा. म्हणजे तुम्ही दिवसातला कमीत कमी वेळ इंटरनेटवर घालवाल. बार किंवा रेस्टॉरण्टमध्ये गेल्यावर वाय-फाय वापरण्याचा मोह आवरा. आजकाल घरीही प्रत्येकजण आपापल्या मोबाइलवरच गुंतलेला असतो. त्यामुळे प्रवासातला वेळ आपल्या प्रियजनांसोबत घालवण्याचा आनंद घ्या. आणि हो प्रवासात तयार झालेलं हे बॉण्डिंग घरी आल्यावरही कायम ठेवा.

इतरांचीही थोडी मदत घ्या

तुम्हाला जर एकट्यानं हा फोन संन्यास पाळणं अवघड होत असेल तर थोडी इतर गोष्टींचीही मदत घ्या. काही हॉटेल्समध्ये स्पा थेरेपी, स्टीम बाथ, मसाज अशा रिलॅक्स करणार्याअधिकच्या गोष्टी असतात, ज्यामुळे तुमचं लक्ष फोन, इन्स्टाग्राम, फेसबुक यावरु न स्वत:च्या शरीरावर, मनावर केंद्रीत होईल.
तुम्ही जर कॅम्पिंगसाठी जात असाल तरी तुम्हाला फोनपासून दूर रहायला आयोजकांचीही मदत होते. कारण अनेक आयोजक कॅम्पर्सना फोन, लॅपटॉप, टॅब लॉकर रूममध्ये ठेवून तिथल्या योगा, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टससारख्या गोष्टींचा आनंद घ्यायला सांगतात. 
आपल्या प्रवासात फोनला दूर ठेवण्याच्या या काही बेसिक टिप्स. तुम्हाला जर यासंबंधी अजून काही कल्पना किंवा माहिती हवी असेल तर तुम्ही Digitaldetoxholidays.comया वेबसाइटला भेट देऊ शकता. इथे तुम्ही फिरायला कुठे जाणार आहात, तुम्हाला तुमच्या फोनपासून किती आणि कसं दूर राहणं जमेल याचा विचार करून माहिती दिली जाते.
आपण नेहमी करत नाही किंवा करु शकत नाही अशा गोष्टींसाठीच तर आपण प्रवास करत असतो. त्यामुळे प्रवासात डिजटल डिटॉक्सचाही प्रयोग करु न पहायला नक्कीच हरकत नाही.

 

 

Web Title: Digital Detox is proper option for experience of real enjyoment of an outing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.