फुकट ‘वायफाय’च्या हव्यासाचे बळी ठरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:05 PM2017-10-07T16:05:30+5:302017-10-07T16:15:47+5:30
सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरताना घ्या काळजी..
- मयूर पठाडे
दिवाळीच्या आता अनेकांना सुट्या लागतील. काही जण दिवाळीनिमित्त खास सुट्याही घेतील. फिरायला जातील. असंही आता दिवाळीच्या काळात फिरायला जाण्याचा ट्रेंड बºयापैकी वाढला आहे. मात्र बाहेरगावी जाताना काही गोष्टींची काळजी अवश्य घेतली पाहिजे. अगदी साध्या साध्या गोष्टी, पण तुमची चिंता त्यामुळे खूपच कमी होईल.
बºयाचदा ‘फुकट ते उत्तम’ अशी आपली समजूत असते. त्यामुळे फुकट काही मिळत असलं की लगेच त्यावर आपल्या उड्या पडतात. ‘वायफाय’ हे त्याबाबतचं एक उत्तम उदाहरण. प्रवासात, स्टेशनवर फुकट मिळतंय म्हणून अनेक जण आपापले मोबाईल काढून त्यावर तासन्तास किंवा जितकं म्हणून नेट वापरता येईल तितकं वापरण्याचा प्रयत्न करतात, पण असं करणं फारच धोकादायक ठरू शकतं.
सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं नेट वापरण्यामुळे हॅकिंगला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. आपल्या मोबाईलमधील अतिशय महत्त्वाची आणि गुप्त माहिती इतरांपर्यंत पोहोचण्याची आणि त्याचा दुरुपयोग केला जाण्याची मोठीच शक्यता असते. आजवर अशाच माध्यमातून हॅकर्सनी मोठा डल्लाही मारला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फुकटच्या आमिषांपासून दूर राहिलेलं केव्हाही बरं.
आपला मोबाईल कायम पासवर्ड प्रोटेक्टेड असला पाहिजे आणि त्यावर ट्रॅकिंग टुल्स असणंही आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
केवळ मोबाइलच नाही, जी कुठली इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आपण वापरतो, लॅपटॅप, टॅब.. इत्यादि या साºयांसाठीच पासवर्ड अतिशय स्ट्रॉँग असायला हवा आणि सातत्यानं तो बदलतही राहायला हवा.
त्यामुळे आपली महत्त्वाची माहिती चोरीला जाण्याची आणि त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता बºयाच अंशी कमी होते.