तुमच्याकडे भारताचा पासपोर्ट आहे?; मग, 'या' ४७ देशांमध्ये जायला व्हिसाची गरज नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:56 PM2020-01-10T16:56:15+5:302020-01-10T17:03:26+5:30
'पॉवरफुल्ल पासपोर्ट्स'च्या यादीत जपानचा पासपोर्ट अव्वल स्थानी आहे.
कामानिमित्त किंवा भटकंतीसाठी परदेशात जायचं असेल तर पासपोर्टशिवाय पुढे जाऊ शकत नाही. पण, फक्त पासपोर्ट असला की आपला परदेशवारीचा मार्ग सुकर होतो असंही नाही. आपल्या देशाच्या पासपोर्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर किती महत्त्व आहे, तो किती ताकदीचा आहे, यावरही अनेक देशांची दारं उघडणं अवलंबून असतं. या 'पॉवरफुल्ल पासपोर्ट्स'च्या यादीत जपानचा पासपोर्ट अव्वल स्थानी आहे. जपानी पासपोर्टधारक जगातील १९१ देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात. जपान पाठोपाठ सिंगापूर, जर्मनी, दक्षिण कोरिया या देशांचे पासपोर्टही बलशाली आहेत.
भारताचा पासपोर्ट सध्या ८४व्या क्रमांकावर आहे. आपलं स्थान दोन क्रमांकानी घसरलंय. या रँकिंगच्या आधारे जगातील ४७ देश भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसा-फ्री प्रवेश देणार आहेत. तर, ११ देशांची दारं आपल्यासाठी ई-व्हिसानेही उघडू शकतात. अशा एकंदर ५८ देशांची यादी आपण पाहू याः
व्हिसा-फ्री एन्ट्री असलेले देशः
भूतान
डॉमिनिका
इक्वाडोर
अल साल्वेडोर
फिजी
ग्रेनाडा
हैती
जमैका
मॉरिशस
मायक्रोनेशिया
नेपाळ
सेन्ट किट्स अँड नेव्हिस
सेन्ट व्हिन्सेंट अँड द ग्रेनाडिन्स
सामोआ (परमिट ऑन अरायव्हल आवश्यक)
सेनेगल
सीशेल्स
श्रीलंका (विशेष परमिट आवश्यक)
त्रिनिदाद अँड टोबॅगो
व्हॅनआटू
अन्टार्क्टिका
FYRO मॅसेडोनिया
स्व्हॅलबर्ड
मॉन्सेरात
बेस्ट न्यूड बीच...जिथे कपड्यांविनाच समुद्र आणि वाळूचा आनंद घेतात लोक!
भूतानमध्ये कमीतकमी खर्चात सुट्टी इन्जॉय करण्याची संधी, IRCTC ने लॉन्ज केलय खास पॅकेज
व्हिसा ऑन अरायव्हल
बोलिव्हिया
कंबोडिया
केप वर्दे
कोमोरोस
जिबौटी
इथियोपिआ
जिनिया-बिसाऊ
गयाना
इंडोनेशिया
जॉर्डन
लाओस
मादागास्कर
मालदिव्स
मॉरिटानिया
पलाऊ
सेन्ट लुसिया
सोमालिया
टान्झानिया
थायलंड
टोगो
टिमोर-लेस्टे
टुवालू
युगांडा
टर्क्स अँड कैकोस
परदेशात फिरण्यासाठी जायचयं? तर 'हे' खास पॅकेज नक्की बघा
हे आहे जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर, यात अनेक आश्चर्यकारक गोष्टींची होत असते चर्चा
ई-व्हिसा लागणारे देश
बहारिन
आयव्हरी कोस्ट
गॅबॉन
जॉर्जिया
केनिया
मोलडोव्हा
म्यानमार
रवांडा
साओ टोम अँड प्रिन्सिपे
झांबिया
झिम्बाब्वे
त्याशिवाय, भारतीय पासपोर्टधारकांना मलेशियाचा १५ दिवसांचा व्हिसा मोफत मिळू शकतो. तसंच, यूएईनं सर्व देशांतील नागरिकांना पाच वर्षांचा टुरिस्ट व्हिसा देण्याची घोषणा नुकतीच केली आहे.
व्हिसाविना प्रवेश देणाऱ्या देशांमध्ये जायचा प्लॅन करत असाल, तर आपल्या पासपोर्टची व्हॅलिडिटी तपासून घ्या. तो किमान सहा महिने ग्राह्य असायला हवा. तसंच, 'व्हिसा ऑन अरायव्हल' असलेल्या देशांमध्ये जाताना पासपोर्ट साईज फोटो, परतीच्या प्रवासाचं कन्फर्म तिकीट, व्हिसा पेमेंट फी आणि व्हिसा अॅप्लिकेशन फॉर्म सोबत बाळगायला विसरू नका.