दुबईमध्ये फिरायला जाणार असाल तर या गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 04:09 PM2018-10-02T16:09:46+5:302018-10-02T16:10:16+5:30
आज आपल्या देशात तुम्ही कुठेही फिरायला गेलात तर तुम्हाला फार काही विचार करावा लागत नाही. तुम्हाला हवी तशी तुमची ट्रिप तुम्ही एन्जॉय करु शकता.
आज आपल्या देशात तुम्ही कुठेही फिरायला गेलात तर तुम्हाला फार काही विचार करावा लागत नाही. तुम्हाला हवी तशी तुमची ट्रिप तुम्ही एन्जॉय करु शकता. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये जाता तेव्हा काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी लागते. याबाबतचे दुबईमधील नियम फार कठोर आहेत. त्यामुळे जाणून घेऊया अशा ७ गोष्टी ज्या दुबईमध्ये करताना विचारच करावा लागेल.
सार्वजनिक ठिकाणांवर प्रेम करु नका
दुबईमध्ये खुलेआम प्रेम करणे एकमेकांना जवळ घेणे महागात पडू शकतं. इथे किस करणे तर सोडाच पण गर्दीच्या ठिकाणी पार्टनरची गळाभेट जरी घेतली तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते.
फोटोग्राफी करण्याआधी विचार करा
आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, रस्त्याने चालताना कोणत्याही गोष्टींचा फोटो काढतात. पण इथे कुणासोबतही फोटो काढताना त्यांची परवानगी घ्यावी लागते. खासकरुन येथील महिलांची परवानगी घ्यावी लागते.
बोलण्याचं भान
अनेकदा अनेकजण रागाच्या भरात आपल्यावर कंट्रोल करु शकत नाही आणि बोलता बोलता शिव्या देतात. पण जर तुम्ही दुबईमध्ये आहात तर शिव्या देणे तुमच्यासाठी महागात पडू शकतं. जर तुम्ही कुणाला शिवी देत आहात हे कुणी पाहिलं तर तुम्हाला तरुंगाची हवा खावी लागू शकते.
कपड्यांची निवड
दुबईमध्ये कपडे परिधान करतानाही फार विचार करावा लागतो. असे कपडे सोबत ठेवा ज्यांनी तुमचं पूर्ण शरीर झाकलं जाईल. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं शारीरिक प्रदर्शन नाही करु शकत.
एलजीबीटी लोकांनी जरा जपून
जगभरात भलेही एलजीबीटी लोकांच्या नात्याबाबत खुलेपणा असेल, पण दुबईमध्ये मात्र होमोसेक्शुअल लोकांसाठी इथे फार कठोर कायदे आहेत. त्यामुळे तुम्ही जर दुबईला जाणार असाल तर जरा जपून रहा.