कचर्‍यासाठी स्लीपर कोचमध्ये इको फ्रेंडली पिशव्या

By Admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:42+5:302015-09-07T23:27:42+5:30

पुणे : प्रवाशांकडून रेल्वे गाड्यांमधून बाहेर फेकल्या जाणार्‍या कचर्‍यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार्‍या सर्व एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यात इको फे्रंडली पिशव्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पिशव्या स्लीपर व वातानुकुलित डब्यांमध्ये असणार आहेत. या योजनेची पथदर्शी सुरूवात झेलम एक्सप्रेसपासून करण्यात आली आहे.

Eco friendly bag in the sleeper coach for the trash | कचर्‍यासाठी स्लीपर कोचमध्ये इको फ्रेंडली पिशव्या

कचर्‍यासाठी स्लीपर कोचमध्ये इको फ्रेंडली पिशव्या

googlenewsNext
णे : प्रवाशांकडून रेल्वे गाड्यांमधून बाहेर फेकल्या जाणार्‍या कचर्‍यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार्‍या सर्व एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यात इको फे्रंडली पिशव्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पिशव्या स्लीपर व वातानुकुलित डब्यांमध्ये असणार आहेत. या योजनेची पथदर्शी सुरूवात झेलम एक्सप्रेसपासून करण्यात आली आहे.
रेल्वेमध्ये बसल्यानंतर प्रवासी खाद्यपदार्थ खाल्यानंतर त्याचा कचरा गाडीबाहेर फेकून देतात. तर काही प्रवासी गाडीतच हा कचरा टाकतात. गाडी फलाटावर आल्यानंतरही अनेक प्रवाशांकडून फलाटावरच हा कचरा टाकला जातो. मुळात अनेक गाड्यांमध्ये कचरा टाकण्यासाठी व्यवस्था न करण्यात आल्याने प्रवाशांकडून हा कचरा बाहेर फेकण्यात येतो. त्यामुळे गाड्यांबरोबरच फलाट, रेल्वेमार्गावरही कचरा होतो. हे टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्लीपर व वातानुकुलित कोचमध्ये विघटन होणार्‍या प्लॅस्टिक पिशव्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरूवात मागील आठवड्यात झेलम एक्सप्रेसपासून करण्यात आली आहे.
झेलम एक्सप्रेसच्या सर्व स्लीपर कोचमध्ये प्रत्येकी एक पिशवी ठेवण्यात आली आहे. तर वातानुकूलित कोचमध्ये प्रवाशांना दिल्या जाणार्‍या कागदी पिशव्या ठेवल्या जाणार आहे. तसेच या कोचमध्ये कचर्‍याचे डबेही आधीपासूनच उपलब्ध आहेत. पिशव्यांमधील कचरा गोळा करण्यासाठी एकाला ठेका देण्यात आला आहे. झेलम एक्सप्रेसनंतर टप्प्या-टप्याने पुण्यातून सुटणार्‍या सर्व एक्सप्रेस गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली. तसेच प्रवाशांनाही या पिशव्यांमध्येच कचरा टाकण्याचे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे.
-------------

Web Title: Eco friendly bag in the sleeper coach for the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.