कर्मचारी करताहेत अधिकार्यांच्या घरी चाकरी - बातमी जोड लोकमत विशेष
By admin | Published: August 3, 2015 10:26 PM2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30
राजानंद मोरे
Next
र जानंद मोरेचौकटसध्या एका वरिष्ठ अधिकार्या घरी काम करीत असलेल्या एका महिला कर्मचार्याने लोकमतशी बोलताना आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, अधिकार्याच्या घराची स्वच्छता करण्याचे काम सध्या करावे लागत आहे. पीएमपीतील वेळेपेक्षा अधिक काम करून घेण्यात आले. अधिकार्यांची घरी आम्हाला काम करायचे नाही. पीएमपीत कुठेही काम दिले तरी आम्ही ते करण्यास तयार आहोत. हे काम करण्यास नकार दिलेल्या एका महिलेची लगेच बदली करण्यात आली.---------------चौकटहजेरीला नाही अडथळाअधिकार्यांच्या घरी कामासाठी गेल्यानंतर त्याची कुठेही नोंद होत नाही. तसेच हजेरी पत्रकावर दररोज नोंद करण्याचे बंधनही या कर्मचार्यांना नाही. एकाच दिवशी आठवडाभराच्या सह्या केल्या तरी त्यांना कोणीही रोखत नाही. त्यामुळे यामध्ये सर्वच स्तरावरील अधिकारी सहभागी असल्याचे स्पष्ट होते.-------------चौकटमहिला कर्मचार्यांमध्ये धास्तीअधिकार्यांच्या घरी काम करण्यास विरोध असणार्या महिला पुढे आल्या असून त्यांनी पीएमपी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनकडे लेखी तक्रार दिली आहे. युनियनने याला जोरदार विरोध केला असून अधिकारी अशाप्रकारे कर्मचार्यांना त्यांच्या घरी कामावर जुंपू शकत नाहीत, असे स्पष्ट केले आहे. युनियनचे सरचिटणीस सुनिल नलावडे म्हणाले, ही बाब अत्यंत चुकीची आहे. अधिकार्यांच्या घरी काम करणार्या कर्मचार्यांचे वेतन मग त्यांनीच द्यावे. काही महिला कर्मचारी याबाबत धास्तावल्या आहेत.----------