यंदाच्या हिवाळ्यात अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टसची मजा लुटायचीय मग ही 10 ठिकाणं आहेत ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 04:54 PM2017-11-14T16:54:08+5:302017-11-14T17:07:08+5:30

फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी हिवाळ्यासारखा दुसरा सिझन नाही. या दोन्हींची मजा एकत्र लुटता येईल अशी दहा ठिकाणं आपल्या देशात आहे. यापैकी एक निवडा आणि यंदाचा हिवाळा एन्जॉय करा.

Enjoy your winter trip with adventure sports. These are best10 options | यंदाच्या हिवाळ्यात अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टसची मजा लुटायचीय मग ही 10 ठिकाणं आहेत ना!

यंदाच्या हिवाळ्यात अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टसची मजा लुटायचीय मग ही 10 ठिकाणं आहेत ना!

Next
ठळक मुद्दे* तुमची हिवाळ्यातली सुट्टी अविस्मरणीय बनवायची असेल तर गुलमर्ग सारखी जागा नाही. काश्मीरमधलं हे टुमदार गाव स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे.* जगातल्या सर्वोत्तम सर्फिंग गाइड लिस्टमध्ये तामिळनाडूमधल्या मानापैडचा समावेश केला गेला आहे.* रोपारमधल्या काकिर रिसॉर्टमध्ये तुम्हाला फ्लाइंग फॉक्स, क्वार्ड बाइकिंग, रॅपलिंग, पेंट बॉल, हॉर्स रायडिंग नाइट सफारी, जोरबिंग, वॉटर बॉल , ट्रॅम्पोलिनची मजा घेता येऊ शकते.

- अमृता कदम


फिरायला जाण्यासाठी थंडीसारखा मस्त सीझन दुसरा कोणताही नाही. या काळात किनारी प्रदेशांपासून बर्फाच्छादित पर्वतरांगांपर्यंत आणि वाळंवटी प्रदेशापासून हिरव्यागार जंगलांपर्यंत कुठेही फिरायला जाऊ शकता. यंदाच्या थंडीत फिरायला गेल्यावर काहीतरी वेगळं करण्याचा विचार असेल तर या दहा ठिकाणांचा पर्याय नक्की विचारात घ्या. कारण इथे तुम्हाला खास हिवाळी एडव्हेंचर स्पोर्टसची मजा घेता येऊ शकते.

1. कूर्ग

कर्नाटकातल्या या हिल स्टेशनची ओळखच मुळी भारताचं स्कॉटलंड अशी आहे. हिरवाईनं नटलेला हा परिसर तुम्हाला शांततेची अनुभूती तर देतोच पण त्याबरोबर जंगलामधलं कॅम्पिंग, गन फायरिंग, फोटोग्राफी अशा वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटींचाही आनंद घेता येतो. तळ-कावेरी हे कावेरी नदीचं उगमस्थान इथं आहे, त्यामुळे रिव्हर राफ्टिंग करण्याची मजाही तुम्ही इथे लुटू शकता.

 



2. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

हिमालयाच्या कुशीत वसलेलं उत्तराखंड त्याच्या शांत सौंदर्यामुळी देवभूमी म्हणूनच ओळखलं जातं. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क केवळ वाघांसाठी प्रसिद्ध नाही तर रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, जॉर्बिंग, बर्मा ब्रिज हे खेळ खेळून मन रमवू शकता. जिम कॉर्बेटला जाण्यासाठी दिल्लीवरून तुम्ही बायरोड जाऊ शकता. कारण हा प्रवासही एखाद्या अ‍ॅडव्हेंचरपेक्षा कमी नाही.

 

3. रिपियन रिसॉर्ट

रिपरियन रिसॉर्ट गुजरातमधल्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जीप लाइन, हाइरोप, लो रोप, ग्राउण्ड अ‍ॅडव्हेन्चर, व्हॅली क्र ॉसिंग, रिव्हर क्र ॉसिंग, माउंटन बाइकिंग अशा वेगवेगळ्या थ्रीलिंग खेळांचा आनंद घेता येतो. मित्रांच्या ग्रूपसोबत जाण्यासाठी ही एकदम योग्य जागा आहे.
 

4. पाइन पॅलेस रिसॉर्ट

तुमची हिवाळ्यातली सुट्टी अविस्मरणीय बनवायची असेल तर गुलमर्ग सारखी जागा नाही. काश्मीरमधलं हे टुमदार गाव स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे. पण स्कीइंगसोबतच केबल कार, अल्पाइन, स्नो बोर्डिंग या गोष्टीही इथं करता येण्यासारख्या आहेत. स्कीइंगमुळं इथं जाण्याचा सर्वोत्तम काळ हा थंडीचाच असतो.

 

5. अंदमान आणि निकोबार

हिल स्टेशन्स आणि पर्वतरांगाबरोबरच थंडीत तुम्ही अंदमान आणि निकोबार बेटांनाही भेट देऊ शकता. इथलं मुंजोह ओशिएन रिसॉर्ट अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टससाठी नावाजलेलं आहे. अंदमान निकोबारच्या बीच नंबर 5 हॅवलॉकवर हे रिसॉर्ट आहे. स्कूबा डायिव्हंग, स्नोर्कलिंह, डीप सी डायव्हिंगसारखे वेगवेगळे खेळ तुमच्या ट्रीपचा आनंद द्विगुणित करतात. इथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत येणं जास्त चांगलं. कारण मुलांसाठी ही जागा एकदम उत्तम.

6. रोपार

रोपारमधल्या काकिर रिसॉर्टमध्ये तुम्हाला फ्लाइंग फॉक्स, क्वार्ड बाइकिंग, रॅपलिंग, पेंट बॉल, हॉर्स रायडिंग नाइट सफारी, जोरबिंग, वॉटर बॉल , ट्रॅम्पोलिनची मजा घेता येऊ शकते. शिवाय कृषी पर्यटनाचाही आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. घोडेस्वारी, रेडे जुंपलेल्या गाडीतून फेरफटका तसंच ट्रॅक्टरमधून सफर अशा आपल्या रोजच्या आयुष्यात न केल्या जाणा-या गोष्टीही तुम्हाला करता येतात.

 

 

7. ब्रह्मपुत्र फॉरेस्ट रिसॉर्ट

आसाममधलं ब्रह्मपुत्र फॉरेस्ट रिसॉर्ट सदाहरित जंगल आणि वाहण-या जंगलांनी वेढलेल्या परिसरात वसलेलं आहे. इथे हँग ग्लायडिंगसोबतच एंगलिंग, रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, पॅरा सेलिंग, गोल्फ असे खेळही खेळू शकता.

8. मानापैड
जगातल्या सर्वोत्तम सर्फिंग गाइड लिस्टमध्ये तामिळनाडूमधल्या मानापैडचा समावेश केला गेला आहे. सर्फिंग, नौकाविहार, रात्री खेकड्यांची शिकार, वेक बोर्डिंग, स्कूबा डायव्हिंग, फिशिंगच्या आनंदाबरोबरच तुम्ही ओपन सी बोट रायडिंग आणि डॉल्फिन दर्शनाची मजाही इथे घेता येते.

9. अरवली टेण्ट रिसॉर्ट

राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये अरवली टेण्ट रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट दूध तलावाजवळच्या समोर बाग इथं वसलेलं आहे. इथल्या तंबूंमध्ये राहण्याची वेगळीच मजा आहे. इथे ट्रेकिंग आणि सफारीचा मनमुराद आनंद लुटता येतो. त्यामुळेच मोठ्या संख्येनं पर्यटक अरवली टेण्ट रिसॉर्टला पसंती देतात.

10. अर्बन व्हॅली

बंंगळूरूसारख्या शहरातच लोकांना अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टसची मजा मिळावी या हेतूनं अर्बन व्हॅली रिसॉर्टची सुरूवात झाली. हे रिसॉर्ट बेंगळूरूमधल्या आर्ट आॅफ लिव्हिंगच्या जवळच आहे. कायनिंग, पेंट बॉल, एटीवी बाइकवर मनसोक्त खेळून मग इथल्या तलावाच्या किना-यावर शांतपणे बसण्यात एक वेगळाच आनंद आहे.
तुमच्याकडे असलेला वेळ आणि प्रवासाच्या साधनांची कनेक्टिव्हिटी यांचा विचार करून तुम्ही या ठिकाणांपैकी एखादं ठिकाण तुमच्या यंदाच्या हिवाळी ट्रीपसाठी फायनल करु शकता.

 

 

Web Title: Enjoy your winter trip with adventure sports. These are best10 options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.