मिल्क एक्स्प्रेसच्या चाकात बिघाड दौंडजवळची घटना : 52 हजार लिटर दूध पर्यायी व्यवस्थेने हलविले
By Admin | Published: September 3, 2015 11:52 PM2015-09-03T23:52:56+5:302015-09-03T23:52:56+5:30
सोलापूर : आग्य्राकडे दूध घेऊन निघालेल्या ‘मिल्क एक्स्प्रेस’च्या एका व्ॉगनच्या चाकात अचानक बिघाड झाल्याने ती दौंडपासून 5 कि़मी़ अंतरावर थांबवण्यात आली़ रोड टँकरने पर्यायी व्यवस्था करुन 52 हजार दूध खराब होण्यापासून वाचवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने गुरुवारी दुपारी केल़े
स लापूर : आग्य्राकडे दूध घेऊन निघालेल्या ‘मिल्क एक्स्प्रेस’च्या एका व्ॉगनच्या चाकात अचानक बिघाड झाल्याने ती दौंडपासून 5 कि़मी़ अंतरावर थांबवण्यात आली़ रोड टँकरने पर्यायी व्यवस्था करुन 52 हजार दूध खराब होण्यापासून वाचवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने गुरुवारी दुपारी केल़े आज दुपारी 12़35 वाजता दौंड स्थानकावरुन मिल्क एक्स्प्रेस दुधाचे 13 व्ॉगन घेऊन निघालेली होती़ पुढे 5 कि़ मी़ अंतरावर जाताच एका व्ॉगनच्या चाकात बिघाड झाली आणि लोकोपायलटने हे लक्षात आणून देताच गाडी थांबवण्यात आली़ एका व्ॉगनमध्ये जवळपास 4 हजार लिटर दूध भरलेले होत़े यावेळी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तत्काळ हालचाली केल्या़ पर्यायी रोड टँकरने व्यवस्था करुन हे दूध दौंड येथील कोल्ड स्टोअरेजमध्ये परत आणण्यात आल़े अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक क़ेमधुसूदन, मुख्य वाणिज्य निरीक्षक बेस्टी ऑगस्टीन, मुख्य पार्सल सुपरवायझर सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पर्यायी व्यवस्था केली़ (प्रतिनिधी)दुरुस्तीसाठी लागले 6 तास या मार्गावरुन धावणारी झेलम, साईनगर यासह अन्य काही गाड्या नगर, दौंड, विसापूर स्थानकावरच थांबवण्यात आल्या़ सायंकाळी 6़30 वाजता चाकांची दुरुस्ती झाली़ दुरुस्ती कामानंतर रेल्वे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला़