म्हणून इथे एकमेकांवर फेकतात पीठ आणि अंडी, नकार दिल्यास भरावा लागतो मोठा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 05:14 PM2019-12-31T17:14:14+5:302019-12-31T17:17:50+5:30

स्पेनमध्ये २०० वर्ष जुना कॅथोलिक फूड फाइट फेस्टिवल साजरा केला जातो.

Fighting celebrated the festival by throwing eggs and flour in spain |  म्हणून इथे एकमेकांवर फेकतात पीठ आणि अंडी, नकार दिल्यास भरावा लागतो मोठा दंड

 म्हणून इथे एकमेकांवर फेकतात पीठ आणि अंडी, नकार दिल्यास भरावा लागतो मोठा दंड

Next

स्पेनमध्ये २०० वर्ष जुना कॅथोलिक फूड फाइट फेस्टिवल साजरा केला जातो. एसकांटेच्या आईबीआई या ठिकाणी हा सण साजरा करतात. दरवर्षी २८ डिसेंबरला हा सण साजरा केला जातो.  या दरम्यान एकमेकांच्या अंगावर फेकण्यासाठी अंडे, पीठ तसंच नैसर्गीक रंगाचा वापर  केला जातो.

प्रेम, आनंद आणि उत्साह यांचं प्रतिक म्हणून हा सण साजरा केला जातो. अंडे फेकण्याची कृती आनंदाने केली जाते.  तसंच काहीवेळा नाट्यात्मक भांडणं सुध्दा दाखवली जातात त्यात दोन टोळ्यांचा समावेश होत असतो. ही भांडण सकाळी ८ वाजता सुरू होऊन २ वाजता संपतात.  त्या टोळ्यांमध्ये महिलांचाही समावेश असतो.

दोन्ही टीमने वेगवेगळ्या प्रकारचे वेष धारण केले आहेत. या सणाची सुरूवात मेअर यांनी समारंभासोबतच केली. त्यानंतर दोन्ही टीमने एकमेकांच्या अंगावर अंडी, पीठ आणि नैसर्गिक रंग टाकण्यास सुरूवात केली.

या समारंभात १२ हजार अंडी आणि १३ टनपेक्षा अधिक पीठाचा वापर एकमेकांवर फेकण्यासाठी  करण्यात आला. 

स्पेनमधील हा सोहळा पाहण्यासाठी जपान आणि दक्षिण कोरीयातील पर्यटक पोहोचले होते. या समारंभात सगळ्या नागरीकांना सहभागी व्हावं लागतं. जर कोणी व्यक्ती हा उत्साह साजरा करण्यासाठी सामील झाला नाही तर तो व्यक्ती त्या सणाचे नियम तोडत असतो.

अशावेळी त्या व्यक्तीला दंड भरावा लागतो. तसंच दंडाची रक्कम ही चॅरीटीसाठी देण्यात येते. या उत्सवात दक्षिण कोरीया, ब्रिटेन यांसह १२ देशांचे पर्यटक सामील झाले होते. 

Web Title: Fighting celebrated the festival by throwing eggs and flour in spain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.