‘फिनलंड’ प्रवासासाठीचा सुरक्षित देश
By admin | Published: April 29, 2017 04:14 PM2017-04-29T16:14:25+5:302017-04-29T16:14:25+5:30
‘ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या संस्थेनं प्रवासासाठी सुरक्षित देशांची यादी नुकतीच प्रसिद्ध केलीय. त्यात फिनलंड हा देश सर्वात अग्रस्थानी आहे.
- अमृता कदम
जग हे अनेक रहस्यांनी भरलेलं आहे आणि ही रहस्यं शोधण्यातच आयुष्याची मजा आहे. काहीतरी साहस, थ्रील अनुभवायला मिळावं म्हणूनही लोक प्रवासाला निघतात. पण त्याचसोबत सुरक्षितताही प्रवासात तितकीच महत्वाची असते. निसर्गसौदर्य, समुद्रकिनारे अशा सौदर्यानं नटलेला आणि शिवाय जगातला सर्वात सुरक्षित देश अशी पावती मिळालेला एखादा देश असेल तर आपल्या प्रवासाचा आनंद द्विगुणितच होईल, नाही का?
‘ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या संस्थेनं प्रवासासाठी सुरक्षित देशांची यादी नुकतीच प्रसिद्ध केलीय. त्यात फिनलंड हा देश सर्वात अग्रस्थानी आहे. कुठल्याही देशासाठी असा पुरस्कार मिळवणं हे खरंतर अत्यंत प्रतिष्ठेचंच आहे. या यादीत युनायटेड अरब आमिरात दुसऱ्या तर आयर्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. याच यादीत टॉप टेनमध्ये स्थान पटकावणाऱ्या देशांमध्ये ओमान, हॉँगकाँग, सिंगापूर, नॉर्वे, स्वित्झर्लंड,रवांडा आणि कतार यांचा समावेश आहे. दुर्दैवानं आपला भारत मात्र एकूण 136 देशांच्या यादीत 114 व्या स्थानावर आहे.