'या' आयलंडवर पुरूषांना नो एन्ट्री, केवळ महिलांना असेल एन्ट्री, पण असं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 12:49 PM2019-07-10T12:49:42+5:302019-07-10T13:03:11+5:30
तुम्ही काही मंदिरे अशी पाहिली असतील जिथे केवळ पुरूषांना एन्ट्री असते महिलांना नाही. पण कधी पुरूषांना एन्ट्री नसलेल्या आयलंडबद्दल कधी ऐकलंय का?
(Image Credit : Condé Nast Traveller India)
तुम्ही काही मंदिरे अशी पाहिली असतील जिथे केवळ पुरूषांना एन्ट्री असते महिलांना नाही. पण कधी पुरूषांना एन्ट्री नसलेल्या आयलंडबद्दल कधी ऐकलंय का? नाही ना? पण एक असं आयलंड आहे, जिथे केवळ महिलांनाच एन्ट्री दिली जाते. इथे पुरूषांना जाण्यास बंदी आहे.
(Image Credit : Social Media)
सुपरशी असं या अनोख्या आयलंड नाव आहे. जे फिनलॅंडच्या बाल्टिक सी फेसजवळ आहे. हे आयलंड यावर्षीच उघडण्यात आलं. ८.४७ एकर परिसरात असलेलं हे आयलंड अमेरिकेतील उद्योगपती महिला क्रिस्टीना रॉथने खरेदी केलं आहे.
(Image Credit : ABC News - Go.com)
क्रिस्टीना रॉथ एका अशा जागेच्या शोधात होती, जिथे केवळ महिला आरामात सुट्टी एन्जॉय करू शकतील. त्यांना कोणत्याही प्रकारती अडचण येणार नाही. त्यांचं म्हणनं आहे की, या आयलंडमध्ये महिलांना फिटनेस, न्यूट्रिशन आणि त्या सर्व गोष्टी मिळतील ज्या त्यांना रोजच्या धावपळीच्या लाइफमध्ये मिळत नाहीत.
(Image Credit : Social Media)
सुपरशी आयलंडमध्ये एक रिसॉर्ट तयार करण्याचं काम सुरू आहे. या रिसॉर्टमध्ये ४ कॅबिन असतील आणि या कॅबिन्समध्ये आरामात १० महिला राहू शकतील. रिसॉर्टमध्ये स्पा, सोना बाथसहीत वेगवेगळ्या सुविधा असतील. सगळेच कॅबिन पूर्णपणे फिटनेसच्या आधारावर तयार केले जात आहेत. यातील एक कॅबिनची किंमत २ लाख रूपयांपासून ते ४ लाख रूपयांपर्यंत राहील. यात महिला पाच दिवस आरामात घालवू शकतील.
(Image Credit : Social Media)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आयलंडवर जाण्यासाठी तिकीट बुकिंग करण्याआधी महिलांना परवानगी घ्यावी लागेल. इतकेच नाही तर परवानगीसाठी त्यांना स्काइपच्या माध्यमातून चक्क मुलाखतही द्यावी लागेल.
(Image Credit : Social Media)
न्यूयॉर्क पोस्टच्या एका वृत्तानुसार, क्रिस्टीना रॉथ म्हणाल्या की, मला पुरूषांसोबत कोणतीही अडचण नाहीये. पुढे जाऊन या आयलंडवर पुरूषांसाठीही सुविधा केली जाऊ शकते. पण सध्या तरी केवळ आणि केवळ महिलांसाठी इथे एन्ट्री असणार आहे.