मुंबईतील बेस्ट वॉटर पार्क, इथे करा फुल पैसा वसूल मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 04:15 PM2018-04-26T16:15:08+5:302018-04-26T16:15:08+5:30
मुंबईतही आता उन्हाळ्याचा उकाडा फार जास्त जाणवायला लागला आहे. अशावेळी अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात.
मुंबईतही आता उन्हाळ्याचा उकाडा फार जास्त जाणवायला लागला आहे. अशावेळी अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. तर काही लोक मुंबईच्या आसपास वेळ घालवण्याचे पर्याय शोधत असतात. अशाच काही लोकांसाठी आम्ही मुंबईतील बेस्ट वॉटर पार्कची माहिती घेऊन आलो आहोत. ही उन्हाळ्याची सुट्टी तुम्ही या वॉटर पार्कमध्ये मनसोक्तपणे एन्जॉय करु शकता.
1) वॉटर किंगडम
वॉटर किंगडम हा देशातील सर्वात मोठा आणि मुंबईतील सर्वात जुना वॉटर पार्क आहे. प्रत्येक वर्षी या वॉटर पार्कमध्ये मुंबई आणि मुंबई बाहेरील जवळपास 18 लाख टुरिस्ट येतात. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अॅम्यूजमेंट पार्क सुद्धा वॉटर पार्कच्या बाजूला आहे. हा वॉटर पार्क वर्षातील 365 दिवस खुला असतो.
लोकेशन
बोरिवली वेस्ट, बे ब्यू हॉटेलजवळ, मुंबई
तिकीट
लहान मुलांसाठी 699 रुपये
मोठ्यांसाठी - 949 रुपये
2) अॅडलॅब्स अॅक्वामॅजिका
भलेही वॉटर किंगडम हा मुंबईतील सर्वात जुना आणि बेस्ट वॉटर पार्क असेल पण लोक अॅडलॅब्स अॅक्वामॅजिकाला देशातील सर्वात चांगला वॉटर पार्क मानतात. याला भारतातील डिझ्नेलॅंडही म्हटलं जातं. मुंबईजवळ 300 एकरातील या थीस पार्कमध्ये एन्जॉयमेंटसाठी खूपकाही आहे. वेगवेगळ्या राईड्सचा तुम्ही इथे आनंद घेऊ शकता.
लोकेशन
खोपोली-पाली रोड, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे जवळ, खोपोली, मुंबई
तिकीट
लहान मुलांसाठी 599 रुपये
मोठ्यांसाठी - 799 रुपये
3) ग्रेट एस्केप वॉटर पार्क
साधारण 12 एकरात वसलेल्या या वॉटर पार्कमध्ये एका दिवसात जवळपास 3 हजार लोक एकत्र एन्जॉय करु शकतात. पेल्हर तलावाजवळ हिरव्यागार डोंगरात हा वॉटर पार्क आहे. इथेही तुम्ही वेगवेगळ्या राईड्सचा आनंद घेऊ शकता. महत्वाची बाब म्हणजे इथे स्वस्तात तुम्हाला मजा करता येते.
लोकेशन
मुंबई-अहमदाबाद हायवे, विरार(ईस्ट), ठाणे, मुंबई
तिकीट
लहान मुलांसाठी - 200 रुपये
मोठ्यांसाठी - 250 रुपये
4) निशिलॅंड वॉटर पार्क
(Image Credit : amazingindiablog.in)
जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेजवळ हा वॉटर पार्क आहे. जवळपास 55 एकर परिसातील या वॉटर पार्कमध्ये वॉटर स्लाईड्स आणि राईड्सची कोणतीही कमतरता नाहीये.
लोकेशन
NH-4, कंद्रोली, महाराष्ट्र
तिकीट
लहान मुलांसाठी - 300 रुपये
मोठ्यांसाठी - 325 रुपये
5) शॅंग्रीला रिजॉर्ट्स अॅंड वॉटर पार्क
भीवंडी-कल्याण जंक्शनपासून केवळ 11 किमी अंतरावर शॅंग्रीला वॉटर पार्क आहे. येथील खासियत म्हणजे इथे वॉटर पार्कसोबतच रिझॉर्टही आहे. जवळपास 15 एकर परिसरात हा वॉटर पार्क आहे.
लोकेशन
मुंबई-नाशिक हायवे, गंगाराम पाड़ा, ठाणे, भीवंडी
तिकीट
लहान मुलांसाठी - 750 रुपये
मोठ्यांसाठी - 800 रुपये