दोन डेमू ट्रेनला जोडणार प्रत्येकी चार डबे
By admin | Published: July 19, 2015 09:24 PM2015-07-19T21:24:27+5:302015-07-19T21:24:27+5:30
दोन डेमू ट्रेनला जोडणार प्रत्येकी चार डबे
Next
द न डेमू ट्रेनला जोडणार प्रत्येकी चार डबेदिवा-वसई, दिवा-रोहा प्रवाशांना मिळणार दिलासामध्य रेल्वेचा निर्णय, मात्र मंजुरीची प्रतिक्षामुंबई - दिवा-वसई आणि दिवा-रोहा मार्गावर धावत असणार्या डेमू (डिझेल इलेक्ट्रीक मल्टिपल युनिट) ट्रेनचे डबे वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेता दोन डेमू ट्रेनला प्रत्येकी चार डबे जोडण्यात येणार आहेत. त्याच्या मंजुरीसाठी प्रस्ताव मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे पाठवण्यात आला असून त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. प्रस्ताव मंजुर झाल्यास या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळेल. मध्य रेल्वेच्या दिवा-वसई आणि दिवा-रोहा मार्गावर सध्या दोन नव्या डेमू ट्रेन चालवण्यात येत आहेत. दोन डेमू ट्रेनचे काही महिन्यांपूर्वीच या मार्गांवर आगमन झाले. सुरुवातीला या नव्या डेमू दहा डब्यांच्या धावत होत्या. मात्र काही कारणास्तव हे यातील प्रत्येकी दोन डबे काढण्यात आले. त्यामुळे प्रवासी क्षमता कमी झाल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटू लागला. या गाड्यांना नेहमीच गर्दी असल्याने जादा डबे देण्याची मागणी वारंवार केली जात होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर यातील दोन डेमू ट्रेनला प्रत्येकी चार डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकी आठ डब्यांच्या धावणार्या या ट्रेन बारा डब्यांच्या होतील, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकार्याकडून सांगण्यात आले. सध्या एक जुनी डेमू ट्रेन ही कुर्ला येथील कारशेडमध्ये उभी आहे. या उभ्या असलेल्या ट्रेनचे प्रत्येकी चार डबे काढून ते दोन डेमू ट्रेनला जोडण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयात पाठवण्यात आला आहे. मात्र त्याला अद्यापही या कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली नसून त्यामुळे निर्णयास विलंब होत आहे. ...................पनवेल ते चिपळूण मार्गावर डेमू ट्रेन आणखी एक डेमू ट्रेनचा प्रस्ताव रेल्वे बॉर्डाकडे पाठवण्यात आला आहे. ही ट्रेन आल्यास तीला पनवेल ते चिपळूण मार्गावर चालवण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. मंजुरी मिळाली नाही तर ही ट्रेनही दिवा-वसई किंवा दिवा-रोहा मार्गावर चालवण्यात येईल.