जळगाव-भुसावळ दरम्यान चौथी रेल्वे लाईन सुधीरकुमार गुप्ता : दोन वर्षात तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण

By admin | Published: May 11, 2016 12:26 AM2016-05-11T00:26:39+5:302016-05-11T00:26:39+5:30

जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले.

Fourth railway line between Jalgaon and Bhusawal, Sudhirkumar Gupta: Completed the third line in two years | जळगाव-भुसावळ दरम्यान चौथी रेल्वे लाईन सुधीरकुमार गुप्ता : दोन वर्षात तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण

जळगाव-भुसावळ दरम्यान चौथी रेल्वे लाईन सुधीरकुमार गुप्ता : दोन वर्षात तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण

Next
गाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले.

प्रश्न- जळगाव शहरातील चौथ्या फलाटावर तिकीट खिडकीचे काम का होत नाही?
गुप्ता- शिवाजीनगरकडे येणार्‍या या फलाटाकडून जळगाव-भुसावळ तिसर्‍या लाईनचे काम आहे. त्यासोबतच आता चौथी लाईनदेखील तिकडूनच राहणार असल्याने तेथे तिकीट खिडकी करणे शक्य नाही.

प्रश्न- भुसावळ-नाशिक लोकल का सुरू होऊ शकत नाही?
गुप्ता- नवीन गाडी सुरू करायची म्हटल्यास त्यासाठी परवानगी पासून सर्व गोष्टींचा विचार होतो. शिवाय या मार्गावर इतर गाड्या असल्याने लोकलला उत्पन्नही मिळाले पाहिजे. त्यामुळे ते शक्य नाही.

प्रश्न- जळगावातील पिंप्राळा भागाकडील रेल्वे लाईनला लागून असलेली झोपडप˜ी काढणार का?
गुप्ता- भादली ते जळगाव दरम्यान असलेल्या सर्वच झोपडप˜ीधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वेने वेळ दिली होती. तरीदेखील ते काढत नसतील तर ती रेल्वेला काढावीच लागेल. तसे पाहता नवीन लाईन टाकताना हे अतिक्रमण निघणारच आहे.

प्रश्न- उत्पन्न वाढीबाबत काय सांगाल?
गुप्ता- रेल्वेला ५० टक्के प्रवासी आणि ५० टक्के मालवाहतुकीतून उत्पन्न मिळते. सध्या ३० ते ४० टक्क्याने उत्पन्न घटले आहे. कारण येथून होणारी केळी वाहतूक हळूहळू कमी होत आहे. सिमेंटची वाहतूकही कमी झाली आहे. एकूणच या व्यवसायांमध्ये मंदी असल्याने त्याचा रेल्वे उत्पन्नावर परिणाम होतो.

प्रश्न- अपघाताताबाबत काय स्थिती आहे?
गुप्ता- विभागामध्ये गेल्या तीन वर्षात एकही मोठा अपघात झालेला नाही. यासाठी देखभाल व दुरुस्ती मजबूत असली तर अपघात टाळता येतात. अपघातामध्ये गाड्यांच्या अपघातासह आग, कामावर एखादी दुर्घटना घडणे हेदेखील अपघात असतात. मात्र तेही विभागात घडलेले नाही.

प्रश्न- गुन्‘ांची काय स्थिती आहे?
गुप्ता- विभागामध्ये गुन्हे कमी करायचे असल्यास सुविधा वाढविणे गरजेचे असते. जसे रेल्वे लाईन व गाड्यांची संख्या वाढल्यास गर्दी कमी होऊन आपोआप चोरी व इतर गुन्हे कमी होतात. त्या दृष्टीने काम केले जात आहे.

Web Title: Fourth railway line between Jalgaon and Bhusawal, Sudhirkumar Gupta: Completed the third line in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.