प्रवासाला जाताय, की दुसरीकडे कायमचं राहायला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:23 PM2017-10-07T16:23:46+5:302017-10-07T16:24:39+5:30

मग इतकं सामान आणि महत्त्वाच्या गोष्टी सोबत कशासाठी?

Going on a journey, or staying forever? | प्रवासाला जाताय, की दुसरीकडे कायमचं राहायला?

प्रवासाला जाताय, की दुसरीकडे कायमचं राहायला?

Next
ठळक मुद्देपरदेश प्रवासाला जाता आहात, पासपोर्ट घेतला, तेवढं पुरेसं आहे की! आता आणखी आपलं बर्थ सर्टिफिकेट, तेही ओरिजिनल कशासाठी सोबत पाहिजे?तुमच्याकडे बरेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आहेत. मग त्यातलं एखादंच सोबत घ्या.आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसचे रेकॉर्ड व्यवस्थित चेक करीत राहा. कोणतीही संशयास्पद नोंद त्यावर आढळली तर लगेच ते कार्ड ब्लॉक करा.

- मयूर पठाडे

कुठेही जायचं म्हटलं, प्रवास करायचा म्हटलं की दोन पद्धतीचे लोक हमखास आपल्या नजरेला पडतात. काही जण अगदी काहीही तयारी न करता, इतक्या ऐनवेळी जायचं ठरवतात, की बºयाच महत्त्वाच्या गोष्टी करायच्या एकतर राहून तरी जातात नाहीतर ते विसरून तरी जातात. काही जण इतकी तयारी करतात, इतकं सामान, इतक्या गोष्टी आपल्यासोबत घेतात, की जणू काही ते तिथे कायमचं राहायला जाताहेत!
या दोन्हीही गोष्टींचा अतिरेक नको. पण काही गोष्टींची काळजी मात्र घेतलीच पाहिजे. ऐनवेळी उपयोगी पडेल म्हणून अनेक जण नको असलेल्या गोष्टीही आपल्या सोबत घेतात. त्यांचं अनावश्यक ओझं तर आपल्याला होतंच, पण काही वेळा त्यातील एखादी जरी महत्त्वाची गोष्ट गहाळ झाली, चोरीला गेली तर नंतर पस्तावा करण्याची पाळी येते. कारण प्रवासात आपलं बॅगेज गहाळ होण्यापासून, ते चोरी जाण्यापर्यंत आणि काही वेळा घाईत आपणच ते कुठे तरी विसरण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रवासात कोणत्याही अनावश्यक गोष्टींचं ओझं आपण टाळलंच पाहिजे.
समजा तुम्ही परदेश प्रवासाला जाता आहात, पासपोर्ट घेतला, तेवढं पुरेसं आहे की! आता आणखी आपलं बर्थ सर्टिफिकेट, तेही ओरिजिनल कशासाठी सोबत पाहिजे? पण काही जण अशा चुका करतात.
समजा तुमच्याकडे बरेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आहेत. मग त्यातलं एखादंच घ्या की. सगळेच्या सगळे सोबत घेऊन काय उपयोग? पुन्हा ते सांभाळायची कटकट.
समजा तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी घेतल्याच असतील सोबत, तर त्याची एक व्यवस्थित लिस्ट तयार करा.
आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसचे रेकॉर्ड व्यवस्थित चेक करीत राहा. कोणतीही संशयास्पद नोंद त्यावर आढळली तर लगेच ते कार्ड ब्लॉक करा.
घरातून बाहेर पडताना आपल्या घराचीही पुरेशी सुरक्षा तुम्ही घेतली आहे का, याचीही खात्री करून घ्या.
आणखी एक, पण अतिशय महत्त्वाचं..
आपल्या घराच्या बाहेर, आपल्या बिल्डिंगच्या खाली आपली जी पत्रपेटी लावलेली आहे, ती भरून, ओसंडून वाहणार नाही याची अवश्य काळजी घ्या. आपली पत्रपेटी ओसंडून वाहतेय, म्हणजे आपण घरी नाहीत, हे अगदी सहजपणे समजण्याची ती पहिली ओळख आहे. त्यामुळे आपण बाहेरगावी, प्रवासाला जाणार असल्यास आपली पत्रपेटी तुंबणार नाही, याची काळजी अवश्य घ्या. शेजारच्यांनाही आपली पत्रं ताब्यात घ्यायला सांगता येईल.

Web Title: Going on a journey, or staying forever?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.