सुट्यांमध्ये फिरायला जाताय? प्रवासी बना, पर्यटक नव्हे !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2017 12:28 PM2017-04-22T12:28:45+5:302017-04-22T18:01:05+5:30
फिरायला जात असाल तर आपण पर्यटक म्हणून न जाता प्रवासीच्या नजरेने सुट्यांचे नियोजन केले तर फिरण्याचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. यासाठी मात्र काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
Next
कोणत्याही ठिकाणची सविस्तर माहिती घेण्याचे दोन प्रकार असतात. एक ट्यूरिस्ट म्हणजे पर्यटकाच्या नजरेने आणि दुसरा म्हणजे ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासीच्या नजरेने पाहणे. कोणीही जरी फिरायला जात असतील तर त्यांना या दोन्ही पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करावी लागते. पर्यटक आणि प्रवासी यांच्यामध्ये जो मुलभूत फरक आहे तो म्हणजे, पर्यटक आपल्या बनविल्या यादीप्रमाणेच ठरलेल्या ठिकाणांवर फिरणे पसंत करतो. मात्र प्रवासी त्या ठिकाणाची संस्कृति, तेथील खाद्यपदार्थ आणि त्या जागेविषयी नवनवीन गोष्टी जाणून घेण्यात आवड दर्शवितो. यावेळी जर आपण फिरायला जात असाल तर आपण पर्यटक म्हणून न जाता प्रवासीच्या नजरेने सुट्यांचे नियोजन केले तर फिरण्याचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. यासाठी मात्र काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
* संबंधीत जागेविषयी माहिती
ज्या ठिकाणी आपणास फिरायला जायायचे आहे, त्याठिकाणी जाण्याअगोदर त्याबाबत सर्व माहिती जाणून घ्या.
* बोलीभाषा
ज्याठिकाणी जाणार असाल त्याठिकाणची लोकल भाषेची माहिती आपणास असावी हे महत्त्वाचे नाही, मात्र काही बेसिक शब्दांची माहिती असणे आवश्यक असते. गरज पडल्यास आपण या स्किलचा वापर क रु शकता.
* सेल्फी स्टिकच्या ऐवजी ट्रॅडिशनल कॅमेऱ्याचा वापर करा, कारण फोटो काढण्यावर मर्यादा येतील आणि तेथील सौंदर्याचा कॅमºयाऐवजी आपल्या डोळ्यांद्वारे अनुभव घेणार.
* प्रत्येक ठिकाणी वाय-फाय शोधत फिरु नका, आणि आपण काय खात आहोत, कुठे जात आहोत, याविषयी प्रत्येक क्षणांची माहिती सोशल मीडियावर जास्त शेयरदेखील करु नका.
* लोकल फूड ट्राय करा
प्रत्येक ठिकाणची एक वैशिट्यपूर्ण खाद्यसंस्कृति असते. यासाठी जेव्हाही आपण एखाद्या खास ठिकाणी जात असाल तेव्हा तेथील लोकल आणि यूनिक फूड नक्की ट्राय करा. यामुळे आपणास त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यांची माहिती मिळेल.
* लोकल ट्रान्सपोेर्ट
टॅक्सी किंवा कॅबने ट्रॅव्हल करण्यापेक्षा लोकल ट्रान्सपोर्ट जसे बस किंवा मेट्रोने प्रवास करा. हा पर्याय आपणासाठी फक्त स्वस्तच नव्हे तर आपला प्रवास आठवणीतलादेखील ठरेल.
* भाड्याने बाइक घेणे
आपण त्या ठिकाणचा जवळून आणि सविस्तर अभ्यास करू इच्छित असाल तर आपण भाड्याने बाइक किंवा सायकल घेऊ शकता.
* यादी मर्यादीतच ठेवा
फिरायला जाण्याच्या ठिकाणांची यादी मर्यादीतच असू द्या. शिवाय प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी घाई नको. आपल्या ट्रिपसाठी मुबलक वेळ द्या. कारण आपण रोजचा ताणतणाव दूर करण्यासाठी फिरायला गेले आहेत, रेस पूर्ण करायला नव्हे.
* सोलो ट्रिप
ट्रिप दरम्यान एकटे फिरण्याचे नियोजन करा, कारण ज्यावेळी आपण एकटे असता तेव्हा आपले लक्ष विचलित होत नाही आणि आपण जास्त सतर्क राहून आपल्या प्रवासावर फोकस करता.
* एखाद्या घरात राहणे निवडा
हॉटेलच्या रुममध्ये राहण्याऐवजी होम स्टे म्हणजेच एखाद्याच्या घरात किंवा भाड्याच्या रुममध्ये राहणे पसंत करा. हे आपल्या बजेटसाठी स्वस्तदेखील असेल आणि आपण त्या सर्व गोष्टी अनुभवाल ज्याचा आनंद आपणास हॉटेलच्या रुममध्ये मिळणार नाही.
Also Read : आपण पुण्यातील ‘या’ आकर्षक ठिकाणांना भेट दिली का?