श्रीलंकेला व्हिसाशिवाय फिरायला जाण्याची सुवर्णसंधी, कमी खर्चात घ्या पुरेपूर आनंद...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:47 PM2020-01-06T12:47:09+5:302020-01-06T12:52:56+5:30

तुम्हाला जर त्याच त्याच ठिकाणी फिरायला जाऊन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Golden opportunity to travel to Sri Lanka without visa | श्रीलंकेला व्हिसाशिवाय फिरायला जाण्याची सुवर्णसंधी, कमी खर्चात घ्या पुरेपूर आनंद...

श्रीलंकेला व्हिसाशिवाय फिरायला जाण्याची सुवर्णसंधी, कमी खर्चात घ्या पुरेपूर आनंद...

googlenewsNext

तुम्हाला जर त्याच त्याच ठिकाणी फिरायला जाऊन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता श्रीलंकेला जाण्यासाठी मोफत विजा मिळणार आहे. याद्वारे तुम्ही आता श्रीलंकेत जाऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. भारतीय पासपोर्टवर प्रवास करत असलेल्या लोकांचे  दिवस  आता चांगले असणार आहेत. या व्हिसाच्या योजनेची तारीख ३० एप्रिलपर्यंत आहे. कारण फ्रि व्हिसाचा वापर करून मलेशिया आणि आता श्रीलंका सुद्धा जाता येणार आहे. हि सुविधा ४८ देशांना दिली जाणार आहे. त्यात भारताचा  सुद्धा समावेश आहे. 

याआधी भारतीयांना श्रीलंकेला जाण्यासाठी  ऑनलाईन  व्हिसा अराईव्हल सुविधा मिळवण्यासाठी  २ हजार ४०० रूपये द्यावे लागत होते.  श्रीलंकेचे सरकार सध्या एक कॅबिनेट प्रपोजल तयार करत आहे. ज्या अंतर्गत भारतीयांचा सुद्धा विचार केला जाणार आहे. कारण  भारतातील पर्यटकांचा वर्ग जास्त आहे. तसंच  श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तिथली पर्यटकांची संख्या घटलेली परंतू ती आता पूर्वरत होत आहे.

 या स्फोटात २५८ लोकांचा मृत्यू  झाला होता. त्यानंतर श्रीलंकेच्या सरकारने ऑनलाईन व्हिसाची  सुविधा बंद केली होती.  जर तुम्हाला श्रीलंकेत फिरायला जायचं असेल तर  तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता. मसाले आणि चहासाठी प्रसिद्ध असलेलं श्रीलंका शेकडो वर्षांपासून परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. 

दाम्बुला लेणी

श्रीलंकेची राजधानी कोलंबोपासून साधारण दीडशे किमी अंतरावर दाम्बुला हे प्रसिद्ध लेण्यांचे ठिकाण आहे. युनोस्कोकडून दाम्बुला हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले आहे. श्रीलंकेतील सर्वात मोठ्या कोरीव लेण्या येथे पाहायला मिळतात. या परिसरात एकूण ८० लेण्या असून सर्वात मोठ्या ५ लेण्या फारच आकर्षक आहेत. या लेण्यांमध्ये बुद्धाच्या विविध आकाराच्या मूर्ती आणि सुबक असे चित्र खडकांमध्ये कोरलेले आहेत. गौतम बुद्धाशी संबंधित एकूण १५३ प्रतिमा येथे पाहायला मिळतात.

 मुख्य शहर आणि समुद्र किनारा

श्रीलंकेतील प्रमुख शहरं जसे राजधानी कोलंबो, गॉल, जाफना, त्रिंकोमली, बट्टीकलोआ ही समुद्रकिनारी वसलेली आहेत. तर कँडी हे देखणे प्राचीन शहर सुंदर डोंगररांगांमध्ये देशाच्या मधोमध वसलेले आहे. मुख्यतः श्रीलंकेत फिरताना विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्रकिनारे, सर्वदूर परसलेल्या नारळी बागा, विविध प्रकारचे मसाल्यांच्या बागा, चहाचे मळे तुमचं मन मोहून टाकतं.

नुवारायलिया 

डोंगरातून निघालेली केलानी नदी कोलंबोची लाइफलाइन मानली जाते. नुवारायलिया समुद्र सपाटीपासून २ हजार मीटर उंचीवर वसलेलं एक शहर आहे. नेल्लु पुष्प जे १४ वर्षातून केवळ एकदाच फुलतं. या फुलाच्या नावावरुन या जागेचं नाव नुवारायलिया पडलं आहे. 


पि‍न्नावला एलिफन्ट ऑरफनेंज

श्रीलंकेतील या ठिकाणावर तुम्ही एकदा गेलात तर पुन्हा परत येण्याची तुमची इच्छा होणार नाही. कारण हत्ती आणि त्यांच्या पिल्लांची मस्ती बघण्याचा इथल्यासारखा अनुभव कुठेच मिळत नाही.  या ठिकाणी तुम्हाला भरपूर हत्ती पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

Web Title: Golden opportunity to travel to Sri Lanka without visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.