अॅडव्हेंचरसोबत काही वेगळं ट्राय करायचं असेल तर करा गुवाहाटी ते तवांग रोड ट्रिप!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 01:02 PM2018-09-28T13:02:58+5:302018-09-28T13:06:08+5:30

अॅडव्हेंटरसोबत काही वेगळं करण्याची आवड असणाऱ्यांसाठी गुवाहाटी ते तवांगपर्यंतची रोड ट्रिप खास ठरु शकते. यात एन्जॉयमेंटसोबतच खूपकाही नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील.

Guwahati to Tawang adventures road trip | अॅडव्हेंचरसोबत काही वेगळं ट्राय करायचं असेल तर करा गुवाहाटी ते तवांग रोड ट्रिप!

अॅडव्हेंचरसोबत काही वेगळं ट्राय करायचं असेल तर करा गुवाहाटी ते तवांग रोड ट्रिप!

Next

अॅडव्हेंटरसोबत काही वेगळं करण्याची आवड असणाऱ्यांसाठी गुवाहाटी ते तवांगपर्यंतची रोड ट्रिप खास ठरु शकते. यात एन्जॉयमेंटसोबतच खूपकाही नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. पण हा प्रवास सुरु करण्यापूर्वी दोन गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. पहिली हे की, अरूणाचल प्रदेशमध्ये जाण्यासाठी भारतीयांसहीत परदेशी पर्यटकांनाही इनर लाइन परमिटची गरज असते. हे असल्याशिवाय तुम्ही इथे जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुवाहाटी ते तवांग हे अंतर ५१० किमीचं आहे जे एक-दोन रात्रीचा ब्रेक घेऊनच हा प्रवास करावा लागेल. 

बर्फाने झाकले गेलेल रस्ते, दूरदूरपर्यंत गवताच्या हिरवळीने पसरलेले मैदान, गोठलेली तलावे, नद्यांच्या खळखळून वाहणारं पाणी, ओरांग आणि नामेरी पार्कसारखे सुंदर नजारे तुम्हाला या प्रवासादरम्यान बघायला मिळतील. अरूणाचल प्रदेशातील या दोन्ही जागा गुवाहाटी आणि तवांग पर्यटकांच्या पसंतीच्या जागांपैकी एक आहेत. 

गुवाहाटी ते तवांग प्रवास

गुवाहाटी ते तवांग प्रवासात AH1 आणि NH37 वरून तुम्ही सर्वातआधी तेजपूर पोहोचाल. हे येथील सर्वात जुनं शहर आहे. इथे फिरण्यासाठी तुम्हाला अनेक ठिकाणे आहेत. अग्निगढ, कोल पार्क, भैरवी मंदिर, दा पर्वत, ख्रिश्चन सीमेटरी, बामुनी हिल्स तुम्ही इथे बघू शकता. तेजपूरमध्ये एक दिवस थांबून तुम्ही ही सर्व ठिकाणे बघू शकता. 

तेजपूरपासून ६० किमीचा प्रवास करत तुम्ही भालुकपोंग पोहोचू शकता. इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारण २ तास लागतील. भालुकपोंग एक छोटं शहर आहे. इथेचं इनर लाइन परमिट चेक केलं जातं. आणि येथून सुरू होतो तवांगच्या सुंदर प्रवासाला. 
भालुकपोंगपासून ९७ किमी प्रवास केल्यावर तुम्ही बोमडिला येथे पोहोचाल. येथील सौंदर्य तुम्हाला प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही.

बोमडिलामध्ये मोनेस्ट्री आमि इगलनेस्ट वाइल्डलाइफ सेंचुरी फिरण्यासाठी थोडा वेळ नक्की काढा. बोमडिलातून सकाळी निघाल तर हा रोड ट्रिपसाठी परफेक्ट वेळ असू शकतो. येथून ४३ किमी अंतरावर दिरांग व्हॅली आहे. हिरवीगार डोंगरं आणि दऱ्या तुमचा प्रवास आणखी यादगार करतात. पण बोमडिला ते दिरांग आणि तवांगचा प्रवास जरा थकवा आणणारा असेल. मात्र जसेही तुम्ही तवांगला पोहोचाल येथील सुंदरता तुमचा थकवा दूर केल्याशिवाय राहणार नाही. 

कधी जाल?

गुवाहाटी ते तवांग जाण्यासाठी योग्य वेळ मार्च ते ऑक्टोबर मानला जातो. कारण हिवाळा सुरू होताच येथील रस्ते बर्फाने झाकले जातात. अशात ड्राइव्ह करणे कठीण आहे. 

कोणत्या गोष्टींची कराल पॅकिंग

रायडिंग जॅकेट, हॅन्ड ग्लव्ह्स, बूट्स, टॉवेल, टिश्यू पेपर, फर्स्ट एड किट आणि कॅमेरा. तवांगचं वातावरण जरा जास्तच थंड असतं त्यामुळे सोबत गरम कपडे ठेवाच.

Web Title: Guwahati to Tawang adventures road trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.