शिमला, मनाली नव्हे तर अनुभवा जीभीचं निसर्गसौंदर्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 02:47 PM2019-07-25T14:47:21+5:302019-07-25T14:48:35+5:30

भारतातील निसर्गप्रेमींसाठी हिमाचल प्रदेश म्हणजे, स्वर्गचं...  हिमाचल प्रदेश नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात.

Himachal pradesh jibhi village is a must visit for nature lover | शिमला, मनाली नव्हे तर अनुभवा जीभीचं निसर्गसौंदर्य!

शिमला, मनाली नव्हे तर अनुभवा जीभीचं निसर्गसौंदर्य!

googlenewsNext

(Image Credit : TravelTriangle)

भारतातील निसर्गप्रेमींसाठी हिमाचल प्रदेश म्हणजे, स्वर्गचं...  हिमाचल प्रदेश नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. येथे अनेक फेमस टूरिस्ट स्पॉट्स आहेत. परंतु, जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर यासाठी या राज्यातील जीभी गावाला नक्की भेट द्या. चारही बाजूंनी हिरवळीची शाल पांघरलेल्या या गावामध्ये तुम्ही निसर्गाचा अगदी जवळून अनुभव घेऊ शकता. 

(Image Credit : Thrillophilia)

जीभी (Jibhi) हे गाव हिमालयन नॅशनल पार्कपासून फक्त एक तासाच्या अंतरावार आहे, येथे तुम्ही अगदी सहज गाडीने पोहोचू शकता. नॅशनल पार्कपासून जीभीपर्यंतचा प्रवास तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. तुम्हाला या प्रवासादरम्यान अनेक निसर्गरम्य दृश्य पाहाता येतील. 

(Image Credit : Holidify)

जीभीमध्ये तुम्ही ट्रेकिंगही करू शकता. येथे ट्रेकिंगसाठी अनेक ठिकाणं आहेत. खास गोष्ट म्हणजे, येथे ट्रेकिंग करताना तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही रस्ता विसरणं किंवा हरवणं यांसारख्या गोष्टी मनातही आणू नका. कारण येथील स्थानिक नागरिकांनी येथे येणाऱ्या पर्टकांसाठी सर्व रस्त्यांवर खूणा केलेल्या आहेत. ज्यांच्या मदतीन तुम्ही व्यवस्थित ट्रेकिंग करू शकता. 

(Image Credit : mytriphack.com)

ट्रेकिंग व्यतिरिक्त तुम्ही येथे मासे पकडण्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. खासकरून बंजर व्हॅलीच्या ठिकाणी तुम्ही हा आनंद घेऊ शकता. दरम्यान, एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला फिशिंग करण्याआधी परमिशन घ्यावी लागेल. यासाठी तुम्ही स्थानिक लोकांशी बोलून योग्य माहिती घेऊ शकता. 

(Image Credit : Mytriphack)

तसं पाहायला गेलं तरतुम्ही येथे फक्त बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला त्यासाठी आणखी एक ऑप्शन मिळेल. येथे हॉटेलमध्ये राहण्याऐवजी तुम्ही येथील स्थानिक नागरिकांकडे राहू शकता. मग काय तुम्हाला तेथील लोकांमध्ये राहून तेथील निसर्गसौंदर्यासोबतच संस्कृती आणि परंपरा अनुभवता येतील. 

Web Title: Himachal pradesh jibhi village is a must visit for nature lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.