मोफत हाँगकाँग फिरण्याची संधी, पर्यटकांना मिळणार 5 लाख विमान तिकिटे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 07:21 PM2022-10-11T19:21:41+5:302022-10-11T19:22:30+5:30

hong kong : लोकांना हाँगकाँग एअरलाइन्सच्या सेवेशी जोडणे आणि पर्यटनासाठी आपले दरवाजे पुन्हा उघडणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. 

hong kong free air tickets international flight tickets cheap flights price | मोफत हाँगकाँग फिरण्याची संधी, पर्यटकांना मिळणार 5 लाख विमान तिकिटे!

मोफत हाँगकाँग फिरण्याची संधी, पर्यटकांना मिळणार 5 लाख विमान तिकिटे!

Next

कोरोना महामारीमुळे ठप्प झालेले पर्यटन पुन्हा रुळावर आणण्यासाठी हाँगकाँग सरकारने पर्यटकांना मोफत विमान तिकीट देण्याची घोषणा केली आहे. हाँगकाँग विमानतळ प्रशासनाने जगभरातील लोकांना ही तिकिटे मोफत देण्याची घोषणा केली आहे. विमानतळ प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी ही तिकिटे खरेदी केली होती. लोकांना हाँगकाँग एअरलाइन्सच्या सेवेशी जोडणे आणि पर्यटनासाठी आपले दरवाजे पुन्हा उघडणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. 

मोफत तिकिटांची एकूण किंमत जवळपास 2,100 कोटी रुपये आहे. कोरोना महामारीपूर्वी दरवर्षी जवळपास 50 कोटी लोक हाँगकाँगला भेट देत होते, परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये हाँगकाँगने काही कठोर नियम लागू केले, ज्यामुळे त्यांच्या एअरलाइन्सचे नुकसान झाले. जरी हाँगकाँग सरकारने सप्टेंबरमध्ये पर्यटकांसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाइनच्या नियम शिथिल केले असले तरीही आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी हे नियम लागू आहेत.

हाँगकाँग सरकारच्या म्हणण्यानुसार, मोफत विमान तिकीट उपलब्ध करून दिल्याने हॉंगकॉंगला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. मार्केट रिसर्च फर्म युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या वरिष्ठ विश्लेषकाने बीबीसीला सांगितले की, हाँगकाँगची प्री-कोविड परिस्थिती पूर्णपणे बाजाराच्या परत येण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे.

दरम्यान, या मोफत तिकिटांसाठी अर्ज कसा करायचा याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. हाँगकाँग पुढील वर्षी मोफत तिकिटे वितरीत करण्याची योजना आखत आहे. हाँगकाँग विमानतळ प्राधिकरण त्या प्रवाशांना तिकीट प्रदान करेल, जे इनबाउंड आणि आउटबाउंड दोन्ही प्रवास करत आहेत. मात्र, यासाठी अद्याप कोणतीही टाइमलाइन नाही.

आरटीपीसीआर रिपोर्टची गरज भासणार नाही
अलीकडेच, हाँगकाँग सरकारने जाहीर केले की आता इतर ठिकाणांहून येणाऱ्या लोकांसाठी हॉटेलमधील अनिवार्य क्वारंटाइनचा नियम रद्द केला जाईल. येथे येणाऱ्या सर्व प्रवाशांना फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी 48 तास आधी निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्टची गरज भासणार नाही, परंतु आता त्यांना फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी 24 तास आधी निगेटिव्ह अँटिजन टेस्ट रिपोर्ट दाखवावा लागेल.
 

Web Title: hong kong free air tickets international flight tickets cheap flights price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.