विमानतळ झाले पण फायदा काय.. सेवा सुरू नसल्याने दुर्लक्ष : दर्शनी भागात गवताचे जंगल, कोट्यधीची गुंतवणूक पण फायदा नाही
By admin | Published: September 23, 2016 12:47 AM2016-09-23T00:47:45+5:302016-09-23T00:47:45+5:30
जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते.
Next
ज गाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते. जळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील कुसुंबा गावाजवळ ३०३ हेक्टर जमिनीवर विमानतळाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. या कामाला १९७३ मध्ये प्रारंभ झाला होता. विमानतळाचे हे काम भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले. एकाचवेळी ७२ आसन क्षमता असलेले दोन विमाने उतरू शकतील. अशी रचना या विमानतळाची आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर विमानसेवा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. विमानतळ झाले, त्याचे लोकार्पणही झाले. मात्र पुरेसे प्रवासी मिळणे शक्य होणार नाही या शक्यतेने विविध विमानसेवा देणार्या कंपन्यांकडून विमानतळ विकास प्राधिकरणास नकारच मिळत आला आहे. स्थानिक उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेऊन जेट, किंगफिशर सारख्या कंपन्यांशी तीन वर्षांपूर्वी संपर्क साधला. जेटतर्फे यासाठी सर्वेक्षणही झाले होते. मात्र नंतर या कंपनीनेही नकार घंटा वाजलविली. विविध सुविधा विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे कामासाठी ६१ कोटींची निधी मिळाला होता व उर्वरित कामांसाठी ६३ कोटींचा निधी मंजूर होता. प्राप्त निधीतून विमानतळावर विविध कामे पूर्ण झालेली आहेत. यात प्रवासी टर्मिनल पूर्ण झाले आहे. या टर्मिनलची विद्युत उपकरणे ही सौर ऊर्जेवर चालणार आहेत. प्रवासी टर्मिनलमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन कक्ष, प्रवाशांसाठी मोठे प्रतीक्षालय, सुरक्षा तपासणी केंद्र आहे. विमानतळासाठी स्वतंत्र वीज फिडर बसविण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. सध्या असलेली १७०० मीटर लांब व ४५ मीटर रुंदीची धावपी येथे तयार असून सेवा सुरू होऊन प्रतिसाद मिळू लागल्यावर भविष्यात धावपी विस्तारित करण्याचाही प्रस्ताव होता. हे काम झाल्यावर जळगावला बोईंग जातीचे विमानदेेखील उतरू शकेल असे नियोजन होते. विमान उतरल्यानंतर ते ॲप्रनवर येईल. तिथून प्रवाशांना टर्मिनलपर्यंत आणण्यासाठी चारचाकी वाहने ठेवण्यात येतील त्या दृष्टीनेही कामे झालेली असल्याने सुसज्ज असे विमानतळ जळगावात असताना सद्य स्थितीत ते केवळ देखावा ठरत आहे. -------