'या' देशात तीन महिने मावळत नाही सूर्य, रात्रीही असतो दिवसासारखा उजेड!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 03:10 PM2019-10-09T15:10:06+5:302019-10-09T15:13:30+5:30

सकाळी सूर्य उगवल्यावर आणि सायंकाळी मावळल्यावर आपल्याला दिवस आणि रात्रीतील फरक समजतो. पण त्या देशात काय होत असेल जिथे सूर्य कधी मावळतच नाही. आता तुम्ही म्हणाल असं कुठं असतं का?

Iceland where the sun never sets for a few months | 'या' देशात तीन महिने मावळत नाही सूर्य, रात्रीही असतो दिवसासारखा उजेड!

'या' देशात तीन महिने मावळत नाही सूर्य, रात्रीही असतो दिवसासारखा उजेड!

Next

(Image Credit : saga.co.uk)

सकाळी सूर्य उगवल्यावर आणि सायंकाळी मावळल्यावर आपल्याला दिवस आणि रात्रीतील फरक समजतो. पण त्या देशात काय होत असेल जिथे सूर्य कधी मावळतच नाही. आता तुम्ही म्हणाल असं कुठं असतं का? त्याचं उत्तर 'होय' असं आहे. आइसलॅंड देशात वर्षातील काही महिने सूर्य मावळतच नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही बाब तेथील लोकांसाठी सामान्य आहे. 

(Image Credit : guidetoiceland.is)

आइसलॅंड उत्तर अमेरिका आणि यूरोपच्या मधे असलेला देश आहे. या देशाचं क्षेत्रफळ जवळपास १०३,००० वर्ग किलोमीटर इतकं आहे. तर येथील लोकसंख्या साधारण ४ लाख इतकी आहे. इथे मे ते जुलै महिन्या दरम्यान २४ तास सूर्य उजाडलेलाच असतो. 

असं का होतं?

(Image Credit : kimkim.com)

असं होतं त्याला एक कारण आहे. आइसलॅंडच्या उत्तर ध्रुवाजवळ आहे. त्यामुळेच उत्तर ध्रुवाजवळ असलेल्या ठिकाणांवर सूर्य कधीही मावळत नाही. असंही म्हणता येईल की, सूर्य कधी क्षितीजाच्या खाली जातच नाही. त्यामुळे इथे २४ तास सूर्य उजाडलेला असतो. या प्रक्रियेला Midnight Sun असं म्हटलं जातं.

(Image Credit : whatson.is)

असं इथे उन्हाळ्यात मे ते जुलै दरम्यान होतं. पण असंही नाही की, इथे रात्री सूर्याचा फार जास्त प्रकाश असतो किंवा फार जास्त गरमी होत असेल. रात्रीही सूर्याचा प्रकाश असतोच, पण कमी असतो. २४ तास सूर्याच्या प्रकाशात राहणं कसं वाटतं, हे अनुभवण्यासाठी पर्यटक इथे दूरदुरून येतात.

(Image Credit : iceland24blog.com)

याचा सर्वात नकारात्मक पैलू हा आहे की, उन्हाळ्यात आइसलॅंडला जाणारे पर्यटक नॉर्दन लाइट्स बघू शकणार नाही. यासाठी त्यांना हिवाळ्यात तिथे जावं लागेल. जर तुम्हालाही २४ तास सूर्याच्या प्रकाशात रहायचं असेल तर उन्हाळ्यात आइसलॅंडला जाण्याचा प्लॅन करू शकता. यासाठी तुम्हाला आतापासून थोडं सेव्हिंगही करावं लागेल.


Web Title: Iceland where the sun never sets for a few months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.