स्वस्तात फ्लाइट तिकीट बुकींग करायचं असेल तर वापरा या 5 टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 03:53 PM2018-05-16T15:53:43+5:302018-05-16T15:54:34+5:30
आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वस्तात एअर तिकीट बुक करु शकाल. यासाठी तुम्हाला कोणत्याही एअरलाईन्सच्या सेलची वाट पहावी लागणार नाही.
तुम्ही कधीना कधी तुमच्यासाठी किंवा आणखी कुणासाठी फ्लाईट तिकीट बुक केली असेलच. काही लोक असेही असतात ज्यांनी तिकीट महागडं असल्याने तिकीट बुक करण्याआधी 10 वेळा विचार करत असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वस्तात एअर तिकीट बुक करु शकाल. यासाठी तुम्हाला कोणत्याही एअरलाईन्सच्या सेलची वाट पहावी लागणार नाही.
1) फ्लाइट कम्पॅरिजन वेबसाईट चेक करा
कधीही तिकीट बुक करण्याआधी एक-दोन फ्लाइट कम्पॅरिजन वेबसाईटवर तिकीटाची किंमत चेक करा. अशी माहिती देणाऱ्या अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. याचा तुम्हाला फायदा होईल आणि कमी दरात तुम्हाला तिकीट बुक करता येईल.
2) विकेंडला तिकीट बुक करणे टाळा
विकेंडला फ्लाइट तिकीट बुक करणे योग्य ठरणार नाही. याचं कारण म्हणजे विकेंडला तिकीटांच्या किंमती खूप वाढलेल्या असतात. काही एअरलाईन्स शुक्रवारी आपल्या तिकीटांचे दर वाढवतात आणि सोमवारी-मंगळवारी कमी करतात. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी तिकीट बुक करा.
3) डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ऑफर्सचा करा वापर
वेगवेगळ्या बॅंक फ्लाइट बुक करण्यासाठी आपल्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ग्राहकांना स्पेशल ऑफर देतात. त्यामुळे तिकीट बुक करताना या ऑफरचा वापर करा. काही बॅंक क्रेडिट कार्ड पॉईंट रिडीम करुन फ्लाइट तिकीट बुक करण्याची सुविधा देतात. याला एअरमाइल्स म्हणतात. जर तुमच्याकडे जास्त पॉईंट असेल तर तुम्हाला स्वस्तात तिकीट बुक करता येईल.
4) ई-वॉलेटने पेमेंट करा
डिजिटल इंडियानुसार आज अनेक गोष्टींसाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा मिळत आहे. याचाही फायदा तुम्हाला मिळतो. जर तुम्ही पेटीएम, मोबिकविक किंवा फ्रिचार्जने पेमेंट करुन तिकीट बुक कराल तर तुम्हाला कॅशबॅक ऑफर मिळू शकते.
5) प्राईज डिक्लाइनचा अलर्ट लावा
गुगल फ्लाईट्स कोणत्याही फ्लाइटची प्राईस ट्रॅक करण्याचा पर्याय देते आणि दर बदलल्यावर त्याचा वेळोवेळी अलर्ट देते. याचा फायदाही तुम्ही करुन घेऊ शकता.