वैष्णोदेवी, हरिद्वार आणि मथुरा पाहण्याची संधी; रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची खास सुविधा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 02:08 PM2023-09-11T14:08:30+5:302023-09-11T14:09:09+5:30
IRCTC Tour Package 2023: आयआरसीटीसीच्या (IRCTC) या पॅकेज अंतर्गत तुम्ही ऑक्टोबर महिन्यात प्रवास करू शकता. आयआरसीटीसीने ट्विट करून पॅकेजची सविस्तर माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेद्वारे प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळत आहेत. आता रेल्वे तुम्हाला धार्मिक यात्रा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. रेल्वेने एक विशेष पॅकेज (Railway package) आणले आहे, ज्याअंतर्गत तुम्ही हरिद्वार, मथुरा आणि अमृतसरपासून वैष्णोदेवीपर्यंत भेट देऊ शकता. आयआरसीटीसीच्या (IRCTC) या पॅकेज अंतर्गत तुम्ही ऑक्टोबर महिन्यात प्रवास करू शकता. आयआरसीटीसीने ट्विट करून पॅकेजची सविस्तर माहिती दिली आहे.
पॅकेजचे नाव – उत्तर भारत देवभूमी यात्रा (Uttar Bharat Devbhoomi Yatra)
>>पॅकेज किती दिवसांचे असेल? - ८ रात्री/९ दिवस
>> दौरा केव्हा सुरू होईल? - २८ ऑक्टोबर २०२३
>> बोर्डिंग आणि डिबोर्डिंग पॉईंट्स - पुणे - लोणावळा - कर्जत - कल्याण - वसई रोड - वापी - सुरत - बडोदा.
या पॅकेज अंतर्गत तुम्हाला कोणत्या स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल?
>> हरिद्वार - ऋषिकेश, हर की पौडी, गंगा आरती
>> अमृतसर - सुवर्ण मंदिर, अटारी बाघा बॉर्डर
>> कटरा - माता वैष्णो देवी दर्शन
>> मथुरा - कृष्णजन्मभूमी, वृंदावन
Feel your soul connect with Lord Krishna on the Uttar Bharat Devbhoomi Yatra (WZBG08) starting on 28.10.2023 from Pune.
— IRCTC Bharat Gaurav Tourist Train (@IR_BharatGaurav) September 10, 2023
Book now on https://t.co/fitikCKj1q#BharatGaurav#DekhoApnaDesh#Travelpic.twitter.com/WQORhW9Mr2
किती खर्च येईल?
या पॅकेजच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर इकॉनॉमी क्लासमध्ये (स्लीपर) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति व्यक्ती १५३०० रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय, कंफर्ट क्लास (थर्ड एसी) क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति व्यक्ती २७२०० रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर डिलक्स क्लासमध्ये (सेकंड एसी) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति व्यक्ती ३२९०० रुपये खर्च करावे लागतील.
इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी...
इकॉनॉमी क्लासमध्ये (स्लीपर) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑनबोर्ड आणि ऑफबोर्ड जेवणाची सुविधा मिळेल. याशिवाय नॉन-एसी हॉटेलमध्ये तुम्ही डबल आणि ट्रिपल शेअरिंगमध्ये राहू शकाल. याशिवाय नॉन एसी वाहतूक सुविधाही उपलब्ध होणार आहे.