IRCTC ने आणलं आहे एक खास पॅकेज, नेपाळमध्ये सुट्टी करा एन्जॉय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 11:59 AM2019-12-19T11:59:54+5:302019-12-19T12:35:17+5:30

या हिवाळ्यात तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

IRCTC brings a special package, Travel of Nepal | IRCTC ने आणलं आहे एक खास पॅकेज, नेपाळमध्ये सुट्टी करा एन्जॉय 

IRCTC ने आणलं आहे एक खास पॅकेज, नेपाळमध्ये सुट्टी करा एन्जॉय 

googlenewsNext

या हिवाळ्यात तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. IRCTC  ने थंडीची मजा घेण्यासाठी खास टूर पॅकेज  आणलं आहे. हे पॅकेज ५ रात्री आणि ६ दिवसांचं आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला नेपाळ संपूर्ण फिरता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या खास पॅकेजबद्दल.

 नेपाळ टूरच्या या पॅकेजमध्ये तुम्हाला नेपाळची राजधानी काठमांडू, पोखरा. पशुपतीनाथ मंदिर, स्वयंभूनाथ स्तूप , तसंच मनोकामना मंदिर यांसारख्या  प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देता येणार आहे. 'बेस्ट ऑफ नेपाळ' या नावाने ओळखल्या जात असलेल्या या टूर पॅकेजची सुरूवात दिल्ली येथून होणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही २१ जानेवारी, १२ फेब्रुवारी आणि १३ मार्च यापैकी कोणत्याही दिवसाचं तिकीट बुक करू शकता. 

या टूर पॅकेजमध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला फ्लाईटने काठमांडूला नेलं जाईल. त्यानंतर काठमांडूच्या विमानतळावरून तुम्हाला हॉटेलमध्ये नेलं जाईल. तसंच रात्रीच्या जेवणाची सोय केली जाईल. 

पुढच्या दिवशी नाष्त्यानंतर तुम्हाला पशुपतीनाथ मंदिरात नेण्यात येईल. त्यानंतर तिबेटी शरणार्थी केंद्रात नेलं जाईल. संध्यायकाळी स्वयंभू स्तूप पाहण्याची मजा तुम्ही घेऊ शकता. 

तिसऱ्या दिवशी तुम्हाला काठमांडू या ठिकाणावरून पोखरा या ठिकाणी नेण्यात येईल. त्याठिकाणी मनोकामना मंदिर  दाखवले जाईल. चौथ्या दिवशी सकाळी हिमालयात सनराईज व्ह्यू पाहण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. तसंच पोखरा इथले प्रेक्षणीय स्थळ पाहता येतील. 

पाचव्या दिवशी तुम्हाला पोखरा या ठिकाणावरून काठमांडू या ठिकाणी आणलं जाईल. सहाव्या दिवशी काठमांडूवरून दिल्लीला आणलं जाईल.

IRCTC च्या या पॅकेजमध्ये तुम्हाला पाचवेळचा नाष्ता आणि पाचवेळचं रात्रीचं जेवण उपलब्ध करून दिलं जाईल. नेपाळला फिरत असताना गाईड सुध्दा सोबत असेल. जर तुम्ही एकटे जात असाल तर  ३९ हजार रूपये खर्च येईल. तसंच २ व्यक्ती जाणार असतील तर २९ हजार ९५० रुपये एका व्यक्तीला खर्च येईल. तीन व्यक्ती असतील तर २९ हजार ७०० रुपये इतका खर्च येईल. जर तुम्हाला ही टूर बूक करायची असेल तर रिर्जव्हेशन काऊंटरशी संपर्क साधू शकता. 

Web Title: IRCTC brings a special package, Travel of Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.