IRCTC चे चार धाम यात्रेसाठी ११ रात्री आणि १२ दिवसांचे पॅकेज, जाणून घ्या त्याची किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 06:35 PM2022-03-31T18:35:14+5:302022-03-31T18:35:24+5:30
आयआरसीटीसीने नुकतेच चार धाम यात्रेसाठी पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज आझादी आणि देखो अपना देश या अमृत महोत्सवांतर्गत सादर करण्यात आले आहे.
वेळोवेळी देशवासियांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी भारतीय रेल्वे टूर पॅकेज जाहीर करते. आयआरसीटीसीने नुकतेच चार धाम यात्रेसाठी पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज आझादी आणि देखो अपना देश या अमृत महोत्सवांतर्गत सादर करण्यात आले आहे. ११ रात्र आणि १२ दिवसांचे आयआरसीटीसीचे हे चार धाम यात्रा पॅकेज असून ज्यामध्ये तुम्हाला बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीसह इतर अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. प्रति प्रवासी रुपये ५८,९०० रुपये आयआरसीटीसीचे चार धाम यात्रा पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि यमुनोत्रीचे दर्शन दिले जाईल.
१४ मे २०२२ रोजी नागपूर येथून चार धाम यात्रा सुरू होणार आहे. प्रवाशांना येथून विमानाने दिल्लीला आणले जाईल. यानंतर दिल्लीहून हरिद्वार, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि बद्रीनाथपर्यंत रस्त्याने जाईल. आयआरसीटीसीच्या या पॅकेजमध्ये निवासासोबतच नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल. यासोबतच बस, टॅक्सी, ट्रेन आणि विमानातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा होणार आहे. तसेच सर्व तीर्थक्षेत्रांवर आयआरसीटीसीकडून मार्गदर्शकाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
Visit the most revered pilgrim places for Hindus in #India with #IRCTCTourism's all-incl. 12D/11N Char Dham Yatra air tour package. From temple visits to holy ceremonies, experience it all on this divine pilgrimage. For #details, visit https://t.co/rmhSHk2pW9.@AmritMahotsav
— IRCTC (@IRCTCofficial) March 25, 2022
आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट शेअर करून चार धाम यात्रा पॅकेजच्या बुकिंगचे तपशील जाहिर केले आहेत, त्यानुसार तुम्ही आयआरसीटीसी वेबसाइटला भेट देऊन या पॅकेजसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकता. याशिवाय, चार धाम यात्रा पॅकेजचे बुकिंग आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील केले जाऊ शकते.