तिकिट कॅन्सल केल्यानंतर किती वेळात किती पैसे मिळतात? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 04:18 PM2020-01-03T16:18:54+5:302020-01-03T16:23:13+5:30
आपण नेहमीच रेल्वेने प्रवास करत असतो. काहीजण रोज कामानिमित्ताने रेल्वेने प्रवास करतात.
आपण नेहमीच रेल्वेने प्रवास करत असतो. काहीजण रोज कामानिमित्ताने रेल्वेने प्रवास करतात. तर काहीजण कुठे बाहेर फिरायला जाण्यासाठी किंवा नातेवाईकांना भेटी देण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असतात. संपूर्ण भारतात आपण कुठेही रेल्वेने जाऊ शकतो . जास्तीतजास्त ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा वापरली जाते. फिरण्यासाठी किंवा इतर कामासाठी रेल्वेने प्रवास करत असलेल्या लोकांची संख्या जास्त अशावेळी भरपूर लोकं हे एडवान्स बुकिंग करत असतात.
पण काही अडचणींमुळे जर तुम्हाला तिकीट कॅन्सल करायला लागलं तर खूप विचार करायला लागतो. आपले पैसे मिळतील की नाही या बाबत शंका असते. तुम्हाला सुध्दा जर बूकिंग रद्द कराव लागलं तर किती पैसे मिळतील याची माहीती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. आईआरसीटीसीची ऑनलाईन वेबसाइट irctc.co.in यावर गेल्यानंतर तुम्हाला बुक केलेलं तिकिट कॅन्सल करता येणार आहे. यातून पीआरएसए या सिस्टीमच्या माध्यमातून परत मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया फंडिंग पॉलिसी कशी आहे.
आईआरसीटीसीच्या नियमांनुसार टिकिट कॅन्सल करण्यासाठी काही मर्यादा असणार आहेत. तसंच रिफंट पॉलीसी ई-तिकिटच्या स्टेटसवर आधारीत असणार आहे. जर तुमचं तिकिट वेटिंग असेल तर तुम्हाला टिकिट कॅन्सल केल्यानंतर पैसे मिळू शकतात. जर ट्रेन सुरू होण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही तिकीट कॅन्सल केलं तर तुम्हाला क्लेरिकल चार्ज सोडून सगळे पैसे परत मिळू शकतात.
जर तुमचं कन्फॉर्म तिकिट तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही २ दिवस आधी कॅन्सल करा. जर ट्रेन निघण्याच्या १२ तास आधी तुम्ही तिकिट कॅन्सल केलं तर तुम्हाला २५ टक्के रक्कम कापून पैसे परत मिळतात. तेच जर तुम्ही ट्रेन सुरू होण्याच्या ४ तास आधी बुकिंग कॅन्सल करत असाल तर ५० टक्के रक्कम वगळून पैसे परत देण्यात येतात. पण एकदा चार्ट तयार झाल्यानंतर संपूर्ण पैसे कापले जातात.