IRCTCचं न्यू ईयर गिफ्ट; फक्त 45 हजार रूपयांत थायलँड ट्रिप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:32 PM2018-12-24T18:32:15+5:302018-12-24T18:33:13+5:30
सर्वांना न्यू ईयरचे वेध लागले असून तुम्हीही न्यू ईयरसाठी काही खास प्लॅन करण्याच्या विचारात असाल. न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही सुंदर बीचवर फिरायला जाण्यासाठी पर्याय शोधत असाल तर थायलंडला जाऊ शकता.
सर्वांना न्यू ईयरचे वेध लागले असून तुम्हीही न्यू ईयरसाठी काही खास प्लॅन करण्याच्या विचारात असाल. न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही सुंदर बीचवर फिरायला जाण्यासाठी पर्याय शोधत असाल तर थायलंडला जाऊ शकता. आइआरसीटीसीने न्यू ईयरसाठी एक खास ऑफर लॉन्च केली आहे. यामध्ये तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये ट्रिप प्लॅन करू शकता. आइआरसीटीसी फक्त 44,910 रूपयांमध्ये ही ट्रिप तुम्हाला ऑफर करत आहे.
IRCTC welcomes you on an exquisite Thailand expedition commencing on 22nd January 2019. Starting from Bengaluru, it consists of a 4 nights/5 days package covering Pattaya-Bangkok. For more details click https://t.co/cD1TLAfOAB#tourism#irctc#indianrailways#airtourism#travelpic.twitter.com/GmUlEunyYV
— IRCTC (@IRCTCofficial) December 20, 2018
थायलंडच्या या ट्रिप प्लॅनमध्ये विमानप्रवासाचाही समावेश असणार आहे. चार रात्री आणि पाच दिवसांच्या या हॉलीडे पॅकेजची सुरुवात 22 जानेवारी, 2019पासून होणार आहे. या ट्रिपची सुरुवात बंगळूरू पासून होणार आहे. यामध्ये तुम्हाला थायलँड, बँकॉक आणि पटाया यांसारख्या सुंदर ठिकाणांना भेट देता येणार आहे. या ट्रिपच्या पॅकेजची सुरुवात 44910 रूपयांपासून सुरू होणार असून हॉलीडे पॅकेजमध्ये एका व्यक्तीसाठी 50830 रूपये खर्च करावे लागतील. तेच दोन किंवा तीन व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती 44910 रूपये खर्च करावे लागतील. 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी 43150 आणि 2 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी 35900 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
याव्यतिरिक्त आयआरसीटीसीची वेबसाइटनुसार, फ्लाइटची वेळ किंवा त्यामध्ये करण्यात आलेले बदल एयरलाइंसवर अवलंबून असतील. तसेच तिकीट बुकींग करताना तुम्हाला आयआरसीटीसीच्या ऑफिसमध्ये संपर्क करावा लागेल.