अंदमान निकोबारचा प्रवास आणखी सोपा; भारतीय रेल्वेकडून खास रेल्वे सेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 11:30 AM2018-11-24T11:30:10+5:302018-11-24T11:34:55+5:30
जर तुम्हाला निळाशार समुद्र आणि त्यावर तंरगणारं खुलं आभाळ नेहमीच भुरळ घालत असेल तर तुम्ही एकदा तरी अंदमान निकोबारला नक्की भेट द्या. हे एक असं ट्रव्हल डेस्टिनेशन आहे जे फार महाग नाही पण एकदम पैसा वसूल आहे.
जर तुम्हाला निळाशार समुद्र आणि त्यावर तंरगणारं खुलं आभाळ नेहमीच भुरळ घालत असेल तर तुम्ही एकदा तरी अंदमान निकोबारला नक्की भेट द्या. हे एक असं ट्रव्हल डेस्टिनेशन आहे जे फार महाग नाही पण एकदम पैसा वसूल आहे. परंतु येथे जाण्यासाठी आधी विमानाने आणि त्यानंतर बोटीने किंवा बसने प्रवास करावा लागत असे. हा प्रवास अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक आहे. अनेक पर्यटक या प्रवासामुळे अंदमान निकोबारकडे पाठ फिरवतात आणि दुसऱ्या ठिकाणांना पसंती देतात. तुम्हीही अशा पर्यटकांपैकी एक असाल तर आता टेन्शन सोडा. कारण आता अंदमान निकोबारला जाण्याचं टेन्शन नाही. भारतीय रेल्वेमुळे येथे पोहोचणं अधिक सोपं होणार आहे. भारतीय रेल्वेकडून येथे पोहोचण्यासाठी एक खास रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे.
अंदमान निकोबारला जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास
दरम्यान IRCTC एक खास ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रवाशांना थेट अंदमान निकोबारपर्यंतचा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना 240 किमीपर्यंतचा प्रवास ट्रेनने करावा लागणार आहे. या ट्रेनने अंदमान निकोबारला पोहचण्यासाठी प्रवाशांना 10 तासांचा वेळ लागणार आहे. ही ट्रेनसेवा पोर्ट ब्लेयर आणि अंदमान निकोबारमधील दिगलीपूरपासून ही सेवा असून अंदमान निकोबरपर्यंत पोहोचण्यासाठी 10 तासांचा प्रवास करावा लागणार आहे.
सध्या या दोन्ही बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी जलमार्गाचा किंवा बसचा प्रवास करावा लागतो. बसने या बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 14 तासांचा प्रवास करावा लागतो तर जलमार्गाने 24 तासांचा प्रवास करून येथे पोहोचता येते. परंतु रेल्वे मार्गाने फक्त 10 तासांतच येथे पोहोचणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर ट्रनच्या प्रवासात येथील निसर्गसौंदर्यही न्याहाळता येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेने हे प्रोजेक्ट सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु या कामाला हिरवा कंदील मिळाला नव्हता. अंदमान निकोबारकडे पर्यंटकांचा वाढता कल लक्षात घेऊन आता पुन्हा हे प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करण्यात येत असून लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
या प्रोजेक्टमुळे अंदामान निकोबारमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे. सध्या या ठिकाणी जाणाऱ्या पर्यंटकांमध्ये भारतीय पर्यंटकांची संख्या फार मोठी आहे. सध्या हा रेल्वेमार्ग तयार होण्यासाठी फार वेळ लागणार आहे. यासाठी आकारण्यात येणाऱ्या तिकीटाची घोषणा अद्याप IRCTC मार्फत करण्यात आली नाही.
...म्हणून अंदमन निकोबारला अवश्य भेट द्या
जर तुम्हाला निळ्याशार सुमुद्र किनाऱ्यावर फिरण्याची मजा अनुभवायची असेल तर तुम्ही अंदमान निकोबारला अवश्य भेट देऊ शकता. स्कूबा डायविंगचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये आकर्षणाचं केंद्र आहे. येथे समद्रामधील जीवन अनुभवणं हा एक वेगळा अनुभव असतो.
हिल स्टेशन्स आणि पर्वतरांगाबरोबरच तुम्ही थंडीतही अंदमान आणि निकोबार बेटांनाही भेट देऊ शकता. इथलं मुंजोह ओशिएन रिसॉर्ट अॅडव्हेन्चर स्पोर्टससाठी नावाजलेलं आहे. अंदमान निकोबारच्या बीच नंबर 5 हॅवलॉकवर हे रिसॉर्ट आहे. स्कूबा डायिव्हंग, स्नोर्कलिंह, डीप सी डायव्हिंगसारखे वेगवेगळे खेळ तुमच्या ट्रीपचा आनंद द्विगुणित करतात. इथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबतही जाऊ शकता.
अंदमान निकोबारमध्ये जाण्यासाठी ही योग्य वेळ
अंदमान निकोबारमध्ये ऑक्टोबरपासून मे महिन्यापर्यंत तुम्ही कधीही जाऊ शकता. या दरम्यान येथील तापमान 23 डिग्रीपासून ते 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये येथे तौर्सिम फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. यादरम्यान येथे पर्यटकांची गर्दी असून देश-विदेशातून अनेक पर्यटक येथे येतात.