IRCTC ची शानदार ऑफर! श्रीनगरसह 'या' ठिकाणी फिरण्याची संधी, जाणून घ्या किती खर्च येईल?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 03:38 PM2022-03-29T15:38:31+5:302022-03-29T15:39:01+5:30
IRCTC Tour Packages : IRCTC ने ट्विट करून या पॅकेजची माहिती दिली आहे. ट्विटरवर म्हटले आहे की, मे महिन्यात तुम्ही 6 दिवस काश्मीरला भेट देण्याचा आनंद घेऊ शकता.
IRCTC Tour Packages : या उन्हाळ्यात आयआरसीटीसीने (IRCTC) तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला मे महिन्यात श्रीनगरला भेट देण्याची संधी मिळेल. रेल्वेच्या या पॅकेजमध्ये तुम्ही उन्हाळ्यात गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग सारख्या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.
IRCTC कडून ट्विट...
IRCTC ने ट्विट करून या पॅकेजची माहिती दिली आहे. ट्विटरवर म्हटले आहे की, मे महिन्यात तुम्ही 6 दिवस काश्मीरला भेट देण्याचा आनंद घेऊ शकता. या पॅकेजसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 29,410 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय प्रवाशांना राहण्याची, भोजनाची सुविधा मोफत मिळणार आहे.
Feast your eyes over the breathtaking beauty of #Kashmir with this scenic 6D/5N well-planned, all-incl. air tour package starting at Rs.29,410/-pp* only. Tour departs on 17th May'22. Hurry! Book now on https://t.co/K5OccTOsmv. *T&C Apply@AmritMahotsav
— IRCTC (@IRCTCofficial) March 29, 2022
पॅकेज डिटेल्स चेक करा-
पॅकेजची किंमत - 29,410 रुपये प्रति व्यक्ती
टूर सर्किट - श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग
पोहोचण्याची तारीख - 17 मे 2022
टूरची शेवटची तारीख - 22 मे 2022
टूर किती दिवस असेल - 5 रात्री आणि 6 दिवस
किती खर्च येईल?
या दौऱ्यावर एकच व्यक्ती गेल्यास 37570 रुपये प्रति व्यक्ती खर्च होणार आहे. याशिवाय, डबल ऑक्युपेसीसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 30215 रुपये खर्च करावे लागतील. तसेच, ट्रिपल ऑक्युपेसीसाठी प्रति व्यक्ती 29,410 रुपये मोजावे लागतील.
मुलांसाठी तिकिटाची किंमत किती असेल?
चाइल्ड विथ वर्थ बद्दल बोलायचे झाले तर 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी प्रति व्यक्ती 27805 रुपये खर्च येईल. त्याचबरोबर चाईल्ड विदाउट वर्थ साठी प्रति व्यक्ती 25335 रुपये खर्च केले जातील.
पॅकेजमध्ये काय-काय असेल?
- हवाई तिकीट (रायपूर-श्रीनगर-रायपूर)
- हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
- नाश्ता आणि रात्रीचे जेवण
- वाहतूक
- प्रवास विमा
अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधू शकता
याशिवाय, पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही फोन नंबर 8287932342, 8287932329 वर संपर्क साधू शकता.