IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात गोव्यात फिरण्याची संधी    

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 11:56 PM2021-09-26T23:56:43+5:302021-09-26T23:58:36+5:30

IRCTC Tour Package: जर तुम्ही येत्या काही दिवसात गोव्याला फिरण्यासाठी जाण्याचा  विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज ऑफर करत आहे.

irctc tour package irctc has brought this wonderful package for the people who are planning to visit goa | IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात गोव्यात फिरण्याची संधी    

IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात गोव्यात फिरण्याची संधी    

Next

नवी दिल्ली : ज्या लोकांना फिरायला आवडते त्यांच्यासाठी गोवा नेहमीच आकर्षक राहिला आहे. गोव्याचे निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि गोवा समुद्रकिनारा देशी तसेच परदेशी पर्यटकांना आकर्षित करतो. नवविवाहित जोडप्यांना सुद्धा फिरण्यासाठी गोवा हे एक उत्तम ठिकाण आहे. (irctc tour package irctc has brought this wonderful package for the people who are planning to visit goa)

जर तुम्ही येत्या काही दिवसात गोव्याला फिरण्यासाठी जाण्याचा  विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज ऑफर करत आहे. आयआरसीटीसीने या गोवा टूर पॅकेजला 'ग्लोरियस गोवा एक्स मुंबई' असे नाव दिले आहे. 

टूरची सुरूवात
आयआरसीटीसीच्या तीन रात्री आणि चार दिवसांच्या गोवा टूरसाठी दर शुक्रवारी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरून रात्री 11:05 वाजता कोकण कन्या एक्सप्रेस ट्रेन रवाना होते. एका रात्रीच्या प्रवासानंतर, प्रवासी दुसऱ्या दिवशी उत्तर गोव्यातील थिविम रेल्वे स्टेशनवर पोहोचेल. तेथून यात्रेकरूंना हॉटेलमध्ये नेले जाईल. त्यानंतर यात्रेकरूंना उत्तर गोव्याचे पर्यटन स्थळ दाखविले जाईल. 

उत्तर गोव्यातील यात्रेकरूंना अगुआडा किल्ला, कॅंडोलिम बीच, बाघा बीच, अंजुना बीच, डोना पौला आणि 'क्वीन ऑफ द सी बीच' असे म्हटली जाणारी कळंगुट बीच सारखी ठिकाणे पाहायला मिळतील. यानंतर, रात्रीचे जेवण आणि रात्री विश्रांती घेतल्यानंतर यात्रेकरूंना दुसऱ्या दिवशी दक्षिण गोव्यात नेले जाईल.

कोणत्या सुविधा मिळणार?
या दौऱ्यात गोव्याहून परतण्यासाठी थर्ड एसी आणि सेकंड स्लीपर क्लासची व्यवस्था असेल. कम्फर्ट आणि स्टँडर्ड ऑप्शननुसार प्रवासी हे डबे निवडू शकतात. यासोबतच यात्रेकरुंना रेल्वे स्टेशनवरून हॉटेलमध्ये आणण्याची आणि नेण्याची व्यवस्था केली जाईल. यासह, सर्व साइटसाठी एसी गाड्यांची व्यवस्था असेल.

किती येईल खर्च?
या IRCTC पॅकेजद्वारे गोव्याला जाण्यासाठी तुम्हाला 11,990 रुपये खर्च करावे लागतील.

Web Title: irctc tour package irctc has brought this wonderful package for the people who are planning to visit goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.