उन्हाळ्यात कान्हा नॅशनल पार्कमध्ये फिरून घ्या ठंडा ठंडा कूल अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:38 PM2019-04-08T12:38:11+5:302019-04-08T12:40:49+5:30
उन्हाळ्यात तर थंडावा मिळावा म्हणून लोक वेगवेगळ्या हिल्स स्टेशनला भेट देतात. त्यासोबतच अनेकजण वेगवेगळ्या नॅशनल पार्कमध्ये फिरायला जातात.
काही दिवस शहरातील धावपळीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याचा ट्रेन्ड अलिकडे फारचा वाढला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वातावरणात लोक वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरायला जातात. उन्हाळ्यात तर थंडावा मिळावा म्हणून लोक वेगवेगळ्या हिल्स स्टेशनला भेट देतात. त्यासोबतच अनेकजण वेगवेगळ्या नॅशनल पार्कमध्ये फिरायला जातात. तुम्हीही या उन्हाळ्यात कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. इथे मार्च ते एप्रिल हा फिरण्यासाठी परफेक्ट कालावधी मानला जातो.
कान्हा नॅशनल पार्क हा देशातील सर्वात महत्त्वपूर्ण व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. इथे तुम्ही सहजपणे वाघ बघू शकता. सोबतच वेगवेगळे प्राणीही बघू शकता. त्यामुळे काही दिवस तुम्हाला शांतरपणे आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवायचे असतील तर तुम्ही कान्हा नॅशनल पार्कला आवर्जून जावं.
जंगलची प्रेरणा
रूडयार्ड किपलिंगच्या लोकप्रिय जंगल बुकमधून प्रेरणा घेऊन कान्हा व्याघ्र प्रकल्स तयार केलाय. इथे तुम्ही सफारीवर असाल तर सहजपणे फिरता फिरता वाघ बघू शकता. असे सांगितले जाते की, १८७९ ते १९१० दरम्यान हे ठिकाण इंग्रजांसाठी शिकारीचं महत्त्वाचं स्थान होतं. कान्हाला अभायरण्य म्हणून १९३३ मध्ये मान्यता देण्यात आली. तर १९५५ मध्ये या ठिकाणाला नॅशनल पार्कचा दर्जा देण्यात आला.
मुन्ना टायगर
या नॅशनल पार्कमध्ये आता साधारण १३१ वाघ आहेत. यातील सर्वात लोकप्रिय वाघ म्हणजे मुन्ना. काउंटिगच्या हिशेबाने याला टी १७ नाव देण्यात आलं आहे. २००२ मध्ये जन्माला आलेला मुन्ना पर्यटकांसोबतच येथील लोकांमध्येही लोकप्रिय आहे. त्याच्या कपाळावर कॅट आणि पीएम लिहिलं आहे.
बाराशिंगा आहेत सुरक्षित
(Image Credit : Travelogy India)
बाराशिंगा हे हरणाचा प्रकार आहेत. हरणाची ही प्रजाती सध्या दुर्मिळ होत चालली आहे. इथे त्यांना चांगलं संरक्षण देण्यात आलं आहे. इथे १ हजारांपेक्षाही जास्त बारशिंगा आहेत. डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या मध्यात बारशिंगाच्या प्रजननाचा कालावधी असतो. या काळात तुम्ही इथे फिरायला गेलात तर सहजपणे त्यांना बघता येईल.
पक्ष्यांचा किलबिलाट
या नॅशनल पार्कमध्ये जवळपास ३०० पक्ष्यांच्या प्रजाती बघायला मिळतात. जरा विचार करा कि, इतक्या वेगवेगळ्या पक्ष्यांची किलबिलाट एकत्र ऐकू आल्यावर कसं वाटत असेल.