पंतप्रधानांनी कॉरिडॉरचे लोकर्पण केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची 'ही' वैशिष्ट्ये माहित आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 06:17 PM2021-12-15T18:17:30+5:302021-12-15T18:21:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या काशीविश्वनाथ कॉरिडोरचे १३ डिसेंबर रोजी लोकार्पण केले. प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगात समावेश असलेल्या या स्थानाची काही खास वैशिष्टे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या काशीविश्वनाथ कॉरिडोरचे १३ डिसेंबर रोजी लोकार्पण केले. प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगात समावेश असलेल्या या स्थानाची काही खास वैशिष्टे आहेत.
सर्वप्रथम याचे वेगळे पण म्हणजे हे ज्योतिर्लिंग दोन भागात आहे. उजव्या भागात देवी भगवतीचे स्थान आहे तर डाव्या भागात शिव विराजमान आहेत. म्हणून याला मोक्ष क्षेत्र असे म्हटले जाते. देवीचे स्थान उजवीकडे असणे मुक्तीचा मार्ग मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शृंगाराच्या वेळी सर्व मूर्ती पश्चिमाभिमुख असतात मात्र काशी मध्ये शिव आणि शक्ती दोन्ही एकत्र आहेत. जगात अन्यत्र कुठेच असे स्थान नाही.
मंदिराच्या कळसात श्रीयंत्र आहे. तांत्रिक सिद्धीसाठी तंत्रदृष्टीने चार द्वारे आहेत. शांती, कला, प्रतिष्ठा आणि निवृत्ती अशी त्यांची नावे आहेत. चारी तंत्रांचे एक अलग स्थान जगात कुठेच नाही. शिव आणि शक्ती आणि तंत्रद्वार असा संयोग फक्त याच मंदिरात पाहायला मिळतो.
ईशान्य कोनात ज्योतिर्लिंग असून संपूर्ण विद्या व प्रत्येक कला परिपूर्ण दरबार तंत्र १० महाविद्या असा अद्भुत दरवाजा येथे आहे. येथे शिवाचे नावच ईशान आहे. विश्वनाथ त्रिकंटक त्रिशुलावर येथे विराजमान आहेत असे सांगितले जाते. यामुळे या नगरीत पूर येऊ शकत नाही असेही म्हणतात. येथे शिव, गुरु आणि राजा अश्या दोन्ही स्वरुपात आहेत. विश्वगुरु स्वरुपात ते दिवसभर काशी नगरीत भ्रमण करतात अशी मान्यता आहे.