ताजमहालपेक्षाही जुनं आहे प्रेमाचं 'हे' प्रतिक, कुणी बांधला होता कुणासाठी 'हा' मकबरा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 11:38 AM2019-04-04T11:38:15+5:302019-04-04T11:45:05+5:30

प्रेमाचं सर्वात जुनं प्रतिक म्हणूण सर्वजण ताजमहालकडे बघतात, पण ताजमहाल बांधण्याच्या अनेकवर्षांआधी प्रेमाचं प्रतिक असलेली एक निशाणी तयार करण्यात आली होती.

Khan i khanan tomb shines Rahim ka makbara the symbol of love | ताजमहालपेक्षाही जुनं आहे प्रेमाचं 'हे' प्रतिक, कुणी बांधला होता कुणासाठी 'हा' मकबरा?

ताजमहालपेक्षाही जुनं आहे प्रेमाचं 'हे' प्रतिक, कुणी बांधला होता कुणासाठी 'हा' मकबरा?

Next

(Image Credit : Dustedoff)

प्रेमाचं सर्वात जुनं प्रतिक म्हणूण सर्वजण ताजमहालकडे बघतात, पण ताजमहाल बांधण्याच्या अनेकवर्षांआधी प्रेमाचं प्रतिक असलेली एक निशाणी तयार करण्यात आली होती. एका शक्तीशाली शाही व्यक्तीने त्याच्या पत्नीसाठी मकबरा तयार केला होता. ताजमहाल तयाप होण्यापूर्वी साधारण ४० ते ५० वर्षाआधी ही इमारत तयार केली होती. ही इमारत दिल्लीमध्ये आहे. ही ऐतिहासिक इमारत म्हणजे रहीमचा मकबरा. हा मकबरा बादशाह अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या रहीमने त्याच्या पत्नीसाठी तयार केला होता. निजामुद्दीनमध्ये हुमायूंच्या मकबऱ्याच्या बाजूलाच ही इमारत आहे. 

मुघलकाळात महिलेचा पहिला मकबरा

(Image Credit : wikimapia.org)

रहीमचं पूर्ण नाव अब्दुर्रहीम खान-ए-खान असं होतं. असे मानले जाते की, त्याने त्याची पत्नी माह बानूसाठी मकबरा तयार केला होता. १५९८ मध्ये हा मकबरा बांधला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुघलकाळात एखाद्या महिलेचा तयार करण्यात आलेला हा पहिला मकबरा होता. इथेच रहीमला १६२७ मध्ये दफन करण्यात आले होते. याच्या अनेक वर्षांनी मुघल बादशाह शाहजहांने त्याची पत्नी मुमताजसाठी आग्र्यात ताजमहल तयार केला. 

किंमती दगडांनी तयार मकबरा

(Image Credit : Dustedoff)

रहीमचा मकबरा हुमायूंच्या मकबऱ्याच्या नमून्यावर आधारित आहे. लाल बलुआ दगड, संगमरवराने तयार केलेली ही दोन मजली इमारत एका उंच चबुतऱ्यावर आहे. या मकबऱ्याच्या साधारण १५० वर्षांनंतर या इमारतीत लावण्यात आलेले किंमती दगड काढून सफदरजंग मकबऱ्यावर लावण्यात आले. आज जे सफदरजंग मकबऱ्यात लाल दगड आणि संगमरवराचे दगड आहेत ते रहीम मकबऱ्यातून काढलेले दगड आहेत. सफदरजंग  मकबरा नवाब शुजाउदौलाने त्याचे वडील मिर्झा मुकीम अबुल मंसूर खां यांच्यासाठी तयार केला होता. त्यांना सफदरजंग या नावानेही ओळखले जात होते.  

रहीमचे दोहे आजही प्रसिद्ध

(Image Credit : Ixigo)

रहीम हा तोच रहीम आहे ज्याचे दोहे आपण आजही अनेक हिंदी पुस्तकांमध्ये वाचतो. रहीम हा अकबराचा संरक्षक बैरम खां चा मुलगा होता. तो अकबर आणि जहांगीर दोन्ही बादशहांच्या दरबारात होता. अकबराच्या नवरत्नांपैकी तो एक होता. तसेच नवरत्नांमध्ये बीरबल, राजा टोडरमल, तानसेल आणि अबुल फजल यांचाही समावेश होता. जहांगीर हा बादशहा झाल्यावर रहीमने त्याला विरोध केला होता. त्यामुळे जहांगीरने रहीमची हत्या केली होती. 

कृष्ण भक्त होत रहीम

रहीमला वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान होतं. संस्कृत सोबतच त्याला ज्योतिषशास्त्राचंही ज्ञान होतं. रहीम हा कृष्णाचा भक्त होता. हे त्याच्या रचनांमधून दिसून येतं. या मकबऱ्याची देखभाल आगा खां ट्रस्ट ऑर कल्चर, आर्कियोलॉजिस्ट सर्व्हे ऑफ इंडियासोबत मिळून ४ वर्षांपासून करत आहे. मकबऱ्याचं संरक्षण योग्यप्रकारे न झाल्याकारणाने बरंच नुकसान झालं आहे. 

Web Title: Khan i khanan tomb shines Rahim ka makbara the symbol of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.