इथे इतिहास आणि संस्कृतीच नाही तर निर्सगाचाही घेऊ शकता मनसोक्त आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:36 AM2019-03-11T11:36:01+5:302019-03-11T11:54:34+5:30

जर तुम्ही एका भन्नाट प्रवासाचा प्लॅन करत असाल किंवा तुम्हाला भारताचं ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वाइल्डलाइफ एकाच ठिकाणी पहायचं असेल तर म्हैसूर तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं.

Know about the weekend trip places nearby Mysore | इथे इतिहास आणि संस्कृतीच नाही तर निर्सगाचाही घेऊ शकता मनसोक्त आनंद!

इथे इतिहास आणि संस्कृतीच नाही तर निर्सगाचाही घेऊ शकता मनसोक्त आनंद!

जर तुम्ही एका भन्नाट प्रवासाचा प्लॅन करत असाल किंवा तुम्हाला भारताचं ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वाइल्डलाइफ एकाच ठिकाणी पहायचं असेल तर म्हैसूर तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. म्हैसूर आणि याच्या आजूबाजूला तुम्ही फिरायला गेलात तर तुमच्या कितीतरी इच्छा पूर्ण होतील. सोबतच तुम्हाला निसर्गाचा अनमोल नजाराही बघायला मिळेल. तसेच इथे तुम्हाला इतिहासाची पाने चाळण्याची आणि इतिहास समजून घेण्याची संधीही मिळेल. त्यासोबतच येथील बर्ड सेंच्युरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीही तुम्ही बघू शकता. चला जाणून घेऊ म्हैसूर आणि आजूबाजूला बघण्यासाठी काय काय आहे.

१३९५ ते १९५६ साला पर्यंत ते सुमारे सहा शतकांपर्यंत हे शहर म्हैसूर संस्थानची राजधानी शहर म्हणून विकसीत झाले. १७६० व १७७० च्या दशकातील हैदर अली व टीपू सुलतानची सत्ता असताना थोड्या काळादरम्यान, वाडीयार राजवटीचे म्हैसूरवर राज्य होते. वाडीयार हे कला आणि संस्कृतीचे आश्रयदाते होते आणि त्यांनी शहराच्या व राज्याच्या सांस्कृतिक जडनघडनीत लक्षणीय योगदान दिले व म्हैसूरला सांस्कृतिक राजधानीचाही दर्जा प्राप्त झाला.

श्रीरंगपट्टनम

श्रीरंगपट्टनम म्हैसूरपासून केवळ ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. इतिहासानुसार, हे ठिकाण हैदर अली आणि टीपू सुलतानचेव वडील यांची राजधानी होती. आज हे ठिकाण एका भग्नावस्थेत आहे. या परिसरातच एक प्रसिद्ध रंगनाथस्वामी मंदिर आहे. त्यासोबतच मशिद, बंदीखाना आहे जिथे टीपू सुलतानची हत्या झाली होती. 

त्यासोबतच डारिया दौलत बाग आहे. याला टीपू सुलतान उन्हाळ्यात वापरायला. या बागेची सुंदरता मन मोहून टाकणारी अशीच आहे. येथील सजावट, नक्षीदार काम आणि उत्तम भित्तीचित्रे आकर्षक वाटतात.

महालाच्या जवळ गुम्बज आहे. यात एक सुंदर मकबरा आहे, ज्यात हैदर, टीपू आणि परिवारातील इतर सदस्यांचा समावेश आहे. त्यासोबतच तुम्ही इथे वेलेस्ली ब्रीज, कॅथॉलिक चर्च आणि बारूदसाठी तयार केलेले गोदाम बघू शकता. जे येथील इतिहास, सभ्यता आणि संस्कतीबाबत सांगतात. 

रंगानाथिट्टू

श्रीरंगपट्टनपासून काही किलोमीटर लांब प्रसिद्ध बर्ड सेंच्युरी रंगानाथिट्टू स्थित आहे. असे म्हटले जाते की, ही देशातील सर्वात मोठी बर्ड सेंच्युरी आहे. ही कावेरी नदीच्या प्रवाहात तयार झालेली बर्ड सेंच्युरी आहे. त्यासोबतच काही डोंगर आणि हिरवळ आहे. त्यामुळेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी राहतात.

बालमुरी फॉल

बालमुरी फॉल म्हैसूरच्या उत्तरेला साधारण १५ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण पूर्णपणे हिरव्यागार झाडांनी वेढलेलं असल्याने फारच सुंदर दिसतं. इथे कावेरी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणातून पाणी खाली येतं. इथे बांध भरल्यावर पाणी खाली येतं.

Web Title: Know about the weekend trip places nearby Mysore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.