हिवाळ्यात फिरायला जायचंय? कर्नाटकातील 'या' ठिकाणांवर करा पैसा वसूल ट्रिप!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 05:00 PM2019-12-13T17:00:07+5:302019-12-14T09:26:14+5:30
हिवाळ्यात फिरायला जायला सगळ्यानांच आवडत असतं. वर्षभरात जर तुम्ही कुठेही फिरायला गेला नसाल तर ही योग्य वेळ आहे.
(Image credit- itsrudetostare)
हिवाळ्यात फिरायला जायला सगळ्यानांच आवडत असतं. वर्षभरात जर तुम्ही कुठेही फिरायला गेला नसाल तर ही योग्य वेळ आहे. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी जर तुम्ही काही ठिकाण शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला भारतातल्या कर्नाटक राज्यातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर थंडीची पुरेपूर आनंद घेऊ शकता. कर्नाटक येथील चार ठिकाणांना भेट दिल्यानंतर तुम्हाला निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येईल.
(Image credit- MSRblog.com)
शिमोगा
शिमोगा या पर्यटन स्थळाला कर्नाटकचे रत्न असं संबोधलं जातं. थंड हवेच्या ठिकाणांमध्ये याचा समावेश होतो. शिमोगा या ठिकाणाची सफर करत असताना पर्वत आणि घनदाट जंगल यांचा सुखद अनुभव येतो. तसेच या ठिकाणी वन्य प्राण्यांचे सुध्दा दर्शन घडते. या ठिकाणचे प्रमुख आकर्षण जोग गिर, कोडाचाद्री, दबबे गिर, अगुम्बे, गुदवी पक्षी अभयारण्यात पाहण्यासारखे आहेत.
अगुम्बे
कर्नाटक मधील अगुम्बे हे पर्यटन स्थळ आपल्या जैवविविधतेसाठी प्रसिध्द आहे. यात बकरना, ओनके अब्बी आणि जोगी गुंडी यांसारखे आकर्षक झरे आहेत. सनसेट पॉईन्टला गेल्यानंतर तुम्ही मावळत्या सुर्याचे मनमोहक दृश्य पाहू शकता. याठिकाणी वाघाच्या अनेक प्रजाती पहायला मिळतात.
कूर्ग
कूर्ग हे कर्नाटकमधील आकर्षक आणि प्रसिध्द असे ठिकाण आहे. शांततेचा आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी देशभरातून लोकं या ठिकाणाला भेटी देत असतात. अभय जलप्रपात, नल्कनड पैलेस, बारापोल नदी, ब्रह्मगिरी शिखर, इरुप्पु जलप्रपात, नामद्रोलिंग मठ, नागरहोल राष्ट्रीय उद्यान, ही या ठिकाणची प्रसिध्द स्थळं आहेत.
गोकर्ण
गोकर्ण या कर्नाटक मधील शहरात हिंदूंची धार्मिक स्थळ आहेत. अनेक भाविक गोकर्ण शहरातील महाबळेश्वराच्या मंदिरांना भेटी देतात. शहराला लागूनच समुद्र किनारा आहे. गोकर्ण शहराला कमी गर्दी असलेले गोवा असं सुध्दा म्हटलं जातं. या ठिकाणी असलेल्या समुद्र किनाऱ्यावर लोकं निसर्गाची मजा अनुभवण्यासाठी येतात.
कर्नाटक मधील या शहरातील पर्यटन स्थळांची सफर करायची असेल तर वेगवेगळ्या वाहतुकसेवा उपलब्ध आहेत. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईवरून उड्डपीला उतरून पुढील प्रवास बसने करू शकता. जर विमानाने जाणार असाल तर मंगळुरू येथे उतरून पर्यटन स्थळांना भेटी देता येतील.