'या' क्रूजची सफर कराल तर हे नवीन वर्ष कायम राहील आठवणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 02:37 PM2019-12-11T14:37:04+5:302019-12-11T14:55:58+5:30
हिवाळा सुरू झाला आहे. ख्रिसमस आणि न्यू ईअरच्या सुट्ट्या सुरू होण्यासाठी फक्त काही दिवसच राहीले आहेत.
हिवाळा सुरू झाला आहे. ख्रिसमस आणि न्यू ईअरच्या सुट्ट्या सुरू होण्यासाठी फक्त काही दिवसच राहीले आहेत. तर घरी बसून पार्टी करण्याचा कंटाळा आला असेल. तर आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही हिवाळ्याचा दुप्पट आनंद घेऊ शकता. आत्तापर्यंत तुम्ही अनेक थंड हवेच्या ठिकाणांना भेट दिली असेल. पण आज आम्ही तुम्हाला भारतातील काही क्रूजबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही थंडीचा आनंद घेण्यासोबतच निसर्गाची सफर करू शकता.
एंग्रीया क्रूज
या नाताळच्या सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी आणि नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जर तुम्ही पार्टी करण्याव्यतिरीक्त कुठे जाण्याचा विचार करत असाल. तर मुंबई गोवा यांच्या मधोमध असणारे क्रूज तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. फक्त ७ हजार रूपयांत तुम्ही अंग्रीया क्रूजच्या सफरीचा आनंद घेऊ शकता. या क्रूजमध्ये एकावेळी जवळपास 500 प्रवासी यात्रा करू शकतात. या क्रूजचा हॉल्ट रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग आणि रायगड या ठिकाणी असतो.
वृंदा क्रूज:
केरळच्या मोटार वेसल वृंदा क्रूजच्या माध्यामातून तुम्ही केरळ टूरचा आनंद घेऊ शकता. हा फाईव्ह स्टार क्रूज आहे. या क्रूजवर गेल्यानंतर तुम्ही अलेप्पीच्या निर्मळ पाण्याचा मनमोहक अनुभन घेऊ शकता. या ठिकाणी कथकली आणि मोहीनीअट्ट्म या नृत्यप्रकारांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे नाट्य सादर केले जातात. या ठिकाणी ४ दिवस आणि ३ रात्र राहण्याचा खर्च १.३३ लाख आहे.
केरळ क्रूजः
केरळ शिपिंग आणि इनलॅंड नेविगेशन कॉर्पोरेशन तुम्हाला क्रूजच्या सवारीची संधी उपलब्ध करून देतात. अरब सागरमध्ये कोच्चीपासून एक मिनी डिलक्स सेवा सागररानी समुद्रात १२ किमी चा प्रवास असतो. यात सुंदर नजारे बघण्याची मजा वेगळीच आहे. त्यात तुमची नाष्ट्याची सुध्दा सोय केली जाते. तसेच संध्याकाळच्या वेळी तुम्हाला मावळत्या सुर्याचे नयनरम्य दृश्य पहायला मिळते. या क्रूजमध्ये सुमारे ९० लोकांच्या खाण्यापिण्याची तसेच राहण्याची सोय केली जाते.
कोस्टा नियो क्लासिका क्रूज
या क्रूजवरून भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून ३ ते ७ दिवसांची सफर करता येते. मुंबईपासून सुरू होणारी ही सफर कोच्चीपर्यंत असते. आणि पुढच्या ३ रात्रीत मालदिवपर्यंत पोहोचते. यात तुम्ही पुरातन काळातील मंदिरं, चर्च अशा धार्मिक स्थळांना भेटी देऊ शकता. या क्रूजमध्ये स्पा, थिएटरची सुविधा उपलब्ध आहे. तसंच या क्रूजमधून प्रवास करण्यासाठी ८ दिवस आणि ३ रात्रींचा खर्च २२ हजार रुपये आहे.
एमवी परमहंस विवाडा क्रूज
विवाडा क्रूजवर तुम्ही चार दिवस पर्यटनाचा आनंत घेऊ शकता. हा क्रूज सुंदरबनच्या जंगलातून जातो. या क्रूजमध्ये ४ दिवस आणि ३ रात्र राहण्याचा खर्च जवळपास ९० हजारांपर्यंत जातो. या क्रूजमधून प्रवास करत असताना सुंदरबनच्या जंगलातून जाण्याचा अनुभन फारच सुखद आहे.