शेजारी देश नेपाळ याविषयी काही धक्कादायक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 07:41 AM2022-06-14T07:41:40+5:302022-06-14T08:35:53+5:30

फार कमी लोकांना माहिती असेल कि नेपाळ हा जगातील असा एकमेव देश आहे, कि जो कुणाचा कधीच गुलाम राहिलेला नाही. यामुळे या देशात स्वातंत्र दिवस असा काही प्रकारच नाही.

know some interesting facts about neighboring country Nepal | शेजारी देश नेपाळ याविषयी काही धक्कादायक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? घ्या जाणून

शेजारी देश नेपाळ याविषयी काही धक्कादायक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? घ्या जाणून

googlenewsNext

नेपाळ आणि भारत यांचे नाते वेगळेच आहे. भारतीयांना या देशात जाण्यासाठी विसा किंवा पासपोर्ट लागत नाही. निसर्गसुंदर नेपाळ हा डोंगराळ देश प्रामुख्याने ट्रेकिंग किंवा पर्वतारोहण यासाठी पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. मात्र फार कमी लोकांना माहिती असेल कि नेपाळ हा जगातील असा एकमेव देश आहे, कि जो कुणाचा कधीच गुलाम राहिलेला नाही. यामुळे या देशात स्वातंत्र दिवस असा काही प्रकारच नाही.

नेपाळची राजधानी काठमांडू जवळच्या १५ किमी परिसरात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेली ७ स्थळे आहेत. या देशाला लिव्हिंग कल्चरल म्युझियम म्हणजे जिवंत सांस्कृतिक संग्रहालय असेही म्हटले जाते. या देशात जिवंत देवी पाह्यला मिळतात. कुमारी कन्या येथे देवी म्हणून पुजल्या जातात, त्यांच्या मिरवणुका काढल्या जातात.

या देशाची वेळ माउंट एव्हरेस्ट नुसार ठरविली जाते. त्यामुळे येथे रोज घड्याळ ४५ मिनिटे मागे केले जाते. १४७,१८१ किमी आकाराच्या या देशात १२३ भाषा बोलल्या जातात आणि ८० विविध जनजाती राहतात. मात्र आजपर्यंत येथे एकही जातीय दंगल झालेली नाही. द.आशियातील हा प्राचीन देश मानला जातो.

या देशाचा राष्ट्रीय ध्वज जगातील एकमेव अनोखा ध्वज आहे ज्यात दोन त्रिकोणी पताका सामील आहेत. वरच्या त्रिकोणात चंद्राची प्रतिमा आहे तर खालच्या त्रिकोणात हिंदू व बौद्ध धर्माचे प्रतिक सूर्य प्रतिमा आहे. हा ध्वज १९६२ सालापासून वापरात असला तरी ध्वजाचे डिझाईन २ हजार वर्षापूर्वीचे आहे. हा ध्वज हिमालयाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतो. भगवान राम यांची पत्नी सीता माई नेपाळच्या जनकपुरची होती असे मानतात.

Web Title: know some interesting facts about neighboring country Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.