गोव्यातील 'हा' बीच 'गुप्त बीच' म्हणून ओळखला जातो, याचं नाव आहे एका किटकाच्या नावावरुन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:36 PM2022-02-03T18:36:36+5:302022-02-03T18:37:52+5:30
गोव्यात एक समुद्रकिनारा देखील आहे ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आणि त्या बीचचे नाव आहे बटरफ्लाय बीच. बटरफ्लाय बीच गोव्याच्या कॅनाकोना प्रदेशातील पालोलेमच्या दक्षिणेस आहे. हा गोव्याचा सर्वात निर्जन आणि कमी ओळखला जाणारा किनारा आहे.
गोवा म्हणजे सुंदर सुंदर बीच लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात.आणि हे सुंदर समुद्र किनारे पाहण्यासाठी लोक देश- विदेशातून येत असतात. परंतु गोव्यात एक समुद्रकिनारा देखील आहे ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आणि त्या बीचचे नाव आहे बटरफ्लाय बीच. बटरफ्लाय बीच गोव्याच्या कॅनाकोना प्रदेशातील पालोलेमच्या दक्षिणेस आहे. हा गोव्याचा सर्वात निर्जन आणि कमी ओळखला जाणारा किनारा आहे.
या बीचचे वैशिष्ट्य असे आहे की, या बीचवर वाहनाने थेट जात येत नाही. येथे जाण्यासाठी आपल्याला समुद्रातून बोटीने प्रवास करावा लागतो. या समुद्रकिनाराला बटरफ्लाय बीच असे का नाव देण्यात आले आहे याचे कारण समुद्रकिनारा सभोवतालची झाडे विविध प्रकारच्या फुलपाखरांना आकर्षित करतात. त्यामुळे येथे फुलपाखरांची देखील जास्त आहे. तसेच या बीचचा आकार फुलपाखरासारखाच आहे.
हाऊस ऑफ बटर फ्लाय
नावाप्रमाणेच बटरफ्लाय बीचवर अनेक सुंदर फुलपाखरे मोठ्या प्रमाणात असतात. तसेच या समुद्राच्या किनारपट्टीवर गोल्डफिश असतात. एवढेच नव्हे तर समुद्री अर्चिन, अगदी लालफिश देखील येथे आढळतात. या बटर फ्लाॅय बिचवर आजून एक सुंदर गोष्ट आहे ती, म्हणजे डॉल्फिन. गोव्यात अनेक समुद्र किनाऱ्यांवर डॉल्फिन्स पहाण्यास मिळतात. पण या समुद्र किनारा खूपच शांत असल्याने डॉल्फिनचे खेळ येथे पाहण्याचा वेगळा आनंद मिळतो.
कसे जायचे बटरफ्याय बीचवर..
गोव्यातील बटरफ्लाय बीच हा एक गुप्त समुद्रकिनारा मानला जातो आणि त्यामागील मुख्य कारण म्हणजे या किनाऱ्यावर जाण्यासाठी थेट जाता येत नाही. दुचाकी चालविण्याशिवाय येथे कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. जर तुम्हाला बटरफ्लाय बीचवर जायचे असेल तर प्रथम तुम्ही पंजिमहून पालोलेम बीचवर जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घ्यावी. पालोलेम बीचवरुन आपण बटरफ्लाय बीचवर बोट राईड घेऊ शकता.