एका वेगळ्याच अनुभवासाठी भेट द्या मालदीवच्या 'या' प्रायव्हेट आयलॅंडला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 03:09 PM2019-01-10T15:09:50+5:302019-01-10T15:12:11+5:30
एक वेगळाच अनुभव देणाऱ्या ठिकाणाच्या तुम्ही शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एका चांगला पर्याय घेऊन आलो आहोत.
एक वेगळाच अनुभव देणाऱ्या ठिकाणाच्या तुम्ही शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एका चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. मालदीवमध्ये एक सुंदर कुदादू प्रायव्हेट आयलॅंड आहे. जिथे तुम्ही डायनिंगपासून ते वॉटर स्पोर्ट्स, टेस्टी पदार्थ आणि स्पा यांसारख्या सुविधांचा आनंद घेऊ शकता. हनीमून असो वा फॅमिली ट्रीप किंवा लग्नाचं सेलिब्रेशन मालदीवमधील हे पाईव्ह स्टाप रिसॉर्ट सुट्टी घालवण्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरु शकतं.
कुदादूचं आयलॅंडचं डिझाइन
कुदादू हे प्रायव्हेट आयलॅंड प्रसिद्ध आर्किटेक्ट यूजी यामासाकी यांनी डिझाइन केलं आहे. प्रत्येक व्हिलामध्ये आणि मुख्य दोन मजली इमारतींमध्ये चारही बाजूंनी प्रकाश आणि मोकळी हवा येण्याची व्यवस्था आहे. सोबतच टेरेसवर ९४५ सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. लक्झरी, इको-फ्रेन्डली असलेल्या या आयलॅंडमध्ये रिसायकलिंग प्रोग्राम आणि ग्रीनहाऊसची सुविधा पर्यटकांना आकर्षित करते. या आयलॅंडवर प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी आहे.
प्रायव्हेट बटलर
या प्रायव्हेट आयलॅंडवर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सर्व आवडी पूर्ण होतील. तुम्हाला इथे प्रायव्हेट बटलर्स म्हणजेच शेफ मिळतील. ते सर्व्हिससाठी २४ तास उपलब्ध असतात. म्हणजे इथे तुम्ही फिरण्याचाच नाही तर खाण्याचाही मनसोक्त आनंद घेऊ शकता.
सॉल्ट चेंबर, रिलॅक्सिंग झोन, फिटनेस झोन
इथे फिरण्यासोबतच तुम्ही हिमालयन सॉल्ट चेंबरही बघू शकाल. तसेच मसाज, फेशिअल, एक्यूपंचर, स्पा सारख्या सुविधाही मिळवू शकाल. इथे तुम्ही फिरण्यासोबतच तुमच्या फिटनेसची सुद्धा काळजी घेऊ शकाल. इथे जिमही आहे आणि मेडिटेशन गुरुही आहेत. तसेच वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता.