जगातली दुसरी सर्वात मोठी अन् मजबूत भिंत भारतातील 'या' किल्ल्यात, तुम्ही पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:37 PM2019-12-17T12:37:28+5:302019-12-17T12:44:57+5:30

'The Great Wall China' म्हणजे चीनची भिंत आपल्या लांबी आणि मजबूतीसाठी जगभरात लोकप्रिय मानली जाते. पण जगातली दुसरी सर्वात लांब आणि मजबूत भिंत कोणती आहे?

Kumbhalgarh fort wall is the second longest wall in the World | जगातली दुसरी सर्वात मोठी अन् मजबूत भिंत भारतातील 'या' किल्ल्यात, तुम्ही पाहिली का?

जगातली दुसरी सर्वात मोठी अन् मजबूत भिंत भारतातील 'या' किल्ल्यात, तुम्ही पाहिली का?

googlenewsNext

(Image Credit : indiaraju.com)

'The Great Wall China' म्हणजे चीनची भिंत आपल्या लांबी आणि मजबूतीसाठी जगभरात लोकप्रिय मानली जाते. पण जगातली दुसरी सर्वात लांब आणि मजबूत भिंत कोणती आहे? नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबाबत सांगणार आहोत. जगातली दुसरी सर्वात लांब आणि मजबूत भिंत ही राजस्थानच्या कुंभलगढ किल्ल्याची भिंत मानली जाते. 

(Image Credit : quora.com)

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगढ किल्ल्याची भिंत ही चीनच्या भिंतीनंतर जगातली दुसरी सर्वात मजबूत आणि लांब भिंत आहे. साधारण ३६ किमी लांब ही भिंत तोडणं कुणालाही जमलं नाही. सम्राट अकबर सुद्धा ही भिंत तोडण्यास अपयशी ठरला होता.

(Image Credit : patrika.com)

९ मे १५४० मध्ये महाराणा प्रताप यांचा जन्म याच किल्ल्या झाला होता. कुंभलगढ एकाप्रकारे मेवाडची संकटकालिन राजधानी मानला जातो. या किल्ल्यावर अनेक वर्ष राजपूत लोकांनी राज्य केलं. राजस्थानच्या सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक कुंभलगढ किल्ला उदयपूर पासून ८२ किलोमीटर दूर अरावलीच्या डोंगरावर तयार केला आहे.

(Image Credit : makemytrip.com)

१४४३ मध्ये राणा कुंभने किल्ल्याचं निर्माण केलं होतं. यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने राणा कुंभा यांनी किल्ल्याच्या चारही बाजूने भिंत तयार करण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा या भिंतीचं काम सुरू झालं तेव्हा ते थांबण्याचं नावच घेत नव्हतं. नंतर काम पूर्ण झालं.

(Image Credit : samanyagyan.com)

या ऐतिहासिक किल्ल्याच्या भिंतीची शानदार बनावट पाहून या भिंतीला 'भारताची महान भिंत' असं दर्जा देण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने ही भिंत गुप्त ठेवली गेली होती. समुद्र सपाटीपासून १९१४ मीटर उंचीवर असलेल्या अरावली डोंगरात तयार केलेल्या या भिंतीबाबत सांगितलं जातं की, यावर एकत्र अनेक घोडे धावू शकतात. हजारो दगडांपासून तयार केलेल्या भिंतीची रूंदी १५ मीटर आहे.

किल्ल्यात ३६० मंदिरे

(ImageCredit : gyandarpangk.blogspot.com)

कुंभलगढ किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ७ दरवाजे तयार केले आहेत. ज्यात राम द्वार, पग्र द्वार, हनुमान द्वार इत्यादी प्रसिद्ध आहेत. या किल्ल्याच्या आता एकूण ३६० मंदिरांचा समूह आहे. ज्यात ३०० जैन मंदिरे आणि ६० पेक्षा अधिक हिंदू मंदिरे आहेत. 

(Image Credit : thekumbhalcastle.com)

कुंभलगढ किल्ल्याच्या चारही बाजूने रात्री मशाली पेटवल्या जातात. ज्यामुळे हा किल्ला रात्री उजळून निघतो. दररोज पर्यटकांना इथे सुंदर नजारे बघायल मिळतात. डोंगराच्या टोकावरून या किल्ल्याचा नजारा फारच सुंदर दिसतो.

(Image Credit : patrika.com)

या भिंतीच्या चारही बाजूने भलेही वाळवंट दिसत असेल, पण भिंत आजही मजबूतीने उभी आहे. शेकडो वर्षांपासून या भिंतीला काहीच झालेलं नाही. कुंभलगढ किल्ल्याच्या चारही बाजूने असलेल्या या भिंतीला कुंभलगढची 'सिटी वॉल' म्हटले जाते.


Web Title: Kumbhalgarh fort wall is the second longest wall in the World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.