अॅमेझॉननं केलीय 10 वस्तूंची यादी. या वस्तू जगभरातले प्रवासी प्रवासाला जाताना बाळगतातच! तुमच्याकडे यापैकी काय आहे? तुम्हाला यातलं काय हवंय?
By Admin | Published: May 30, 2017 06:22 PM2017-05-30T18:22:18+5:302017-05-30T18:24:21+5:30
प्रवासासाठी या दहा गोष्टी जगभरात हिट आहे. अमॅझॉनने तशी यादीच केली आहे.
- अमृता कदम
प्रवासाच्या तयारीचा सगळ्यांत महत्त्वाचा भाग म्हणजे शॉपिंग. त्यातही आता पायपीट न करता केवळ एका क्लिकवर आपल्याला हव्या त्या वस्तू घरपोच मागवता येत असल्यानं शॉपिंगसाठी वेगळा वेळ काढण्याचीही गरज नाही. प्रत्येकजण आपल्या प्रवासातल्या गरजेनुसार आणि हौसेनुसारच वस्तू खरेदी करतात. पण तरीही काही गोष्टी अशा आहेत ज्या अनेकांच्या शॉपिंग लिस्टमध्ये समान दिसतील किंवा त्यांची मागणी ही जास्त असते. सध्याच्या सोप्या भाषेत सांगायचं तर त्या ‘ट्रेंण्डिंग’ आहेत.
‘अॅमेझॉन’नं प्रवासासाठीच्या त्यांच्या बेस्टसेलर्सची एक यादीच तयार करायला घेतली. ‘मूव्हर्स अँड शेकर्स’ नावानं तयार केलेल्या या यादीमध्ये सध्या चलतीत असलेल्या 10 ट्रॅव्हल अक्सेसरीजची यादी दिली आहे. जी सगळ्याच फिरायला जाणाऱ्या लोकांच्या बाबतीत लगू पडते.
1. ट्रॉली बॅग हॅण्ड लगेज
एअरलाइन्सच्या हॅण्डबॅगच्या वजनाच्या निकषानुसार तयार केलेल्या या बॅगेत तुलनेनं अधिक सामान बसू शकतं. आतल्या ऐसपैस जागेशिवाय या बॅगेच्या पुढच्या बाजूलाही कप्पे आहेत, जे छोटे छोटे नसून व्यवस्थित हाताळता येतील असे आहेत. त्यामुळेच नेहमी विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांचा कल हा या ट्रॉली हॅण्डबॅगकडे वाढताना दिसतोय.
2. क्रेडिट कार्ड होल्डर वॉलेट
प्रवासात सगळ्यात सांभाळून ठेवावी लागतात ती तुमची क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. खबरदारी म्हणून मग एक कार्ड बॅगेत, एक कार्ड जवळ अजून एखादं असेल तर ते तिसरीकडेच असे उपाय केले जातात. हे क्रेडिट कार्ड होल्डर तुम्हाला तुमची सगळी कार्डस नीट ठेवायला मदत करते. या होल्डरमध्ये क्लिअर पॉकेट्स आहेत. त्यामुळे त्यात तुम्ही तुमचं एखादं ओळखपत्रंही ठेवू शकता. कारण प्रवासात अनेकदा तुम्हाला तुमचं ओळखपत्र वापरायला लागू शकतं. या वॉलेटला छानपैकी झीप असते. शिवाय दहा-बारा कार्डसच्या हिशोबानं रचना असल्यानं ते फार लठ्ठ किंवा कॅरी करायला अवघड जात नाही.