असा किल्ला ज्यावर तोफेगोळेही व्हायचे निकामी, १३ वेळा आक्रमण करून इंग्रज फिरले होते माघारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 01:16 PM2019-09-04T13:16:16+5:302019-09-04T13:21:30+5:30
भारतातील सगळेच किल्ले कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपुरमध्येही आहे.
भारतातील सगळेच किल्ले कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपुरमध्येही आहे. लोहगड(लोहागड) असं या किल्ल्याचं नाव आहे. कुणीही न जिंकू शकलेला हा भारतातील एकमेक किल्ला असल्याचं बोललं जातं. इतकेच काय तर इंग्रजांनीही इथे हार मानली होती.
या किल्ल्याची निर्मिती २८५ वर्षांआधी म्हणजे १९ फेब्रुवारी १७३३ ला जाट शासक महाराजा सूरजमल यांनी केली होती. त्या काळात बारूद आणि तोफेचा वापर अधिक होता. त्यामुळे हा किल्ला तयार करताना एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. ज्यामुळे तोफ गोळे किल्ल्याच्या भींतीवर पडूनही काहीच होत नव्हतं.
या किल्ल्याच्या निर्मितीच्या आधी एक रूंद आणि मजबूत दगडांची भींत तयार करण्यात आली. जेणेकरून तोफ गोळ्यांचा काहीच प्रभाव होऊ नये. त्यासाठी या भिंतीच्या चारही बाजूने शेकडो फूट कच्च्या मातीची भींत उभारण्यात आली आणि खाली खोल खड्डा करून त्यात पाणी टाकण्यात आलं. अशात जर दुश्मन सैन्याने पाणी पार केलं तरी ते सपाट भींतीवर चढू शकत नव्हते.
या किल्ल्यावर आक्रमण करणे कोणासाठीही सोपं नव्हतं. कारण तोफेतून निघणारे गोळे चिखलाच्या भींतीत घुसायचे आणि त्यांची आग विझली जायची. याने किल्ल्याचं काहीच नुकसान होत नव्हतं. त्यामुळेच दुश्मन किल्ल्याच्या आत प्रवेश मिळवू शकत नव्हते.
असे म्हणतात की, हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी १३ वेळा आक्रमण केलं होतं. इंग्रज सैन्यांनी इथे शेकडो तोफगोळे फेकले होते. पण काहीच झालं नाही. ते १३ पैकी एकदाही किल्ल्यात घुसू शकले नाहीत. असे म्हणतात की, इंग्रज पुन्हा पुन्हा हरल्यानंतर निराश झाले आणि तेथून निघून गेले होते.
इतिहासकार जेम्स टाड यांच्यानुसार, या किल्ल्याची सर्वात मोठी खासियत याच्या भींती होत्या. या भींती मातीपासून तयार केल्या होत्या. पण तरी सुद्धा हा किल्ला ताब्यात घेणे म्हणजे लोखंडाचे चणे खाण्यासारखंच होतं.