कॅम्पिंगसाठी जागा शोधताय? मग या 8 पैकी एखादी जागा निवडा. तंबू ठोका, साहसी खेळ खेळा आणि मजा करा!
By Admin | Published: June 9, 2017 06:34 PM2017-06-09T18:34:38+5:302017-06-09T18:34:38+5:30
रोजच्या रूटिनचा कंटाळा आलाय, आयुष्यात थ्रील-एक्साइटमेंट हवी आहे, तर मग कॅम्पिंगला जाच !
- अमृता कदम
रोजच्या रूटिनचा कंटाळा आलाय, आयुष्यात थ्रील-एक्साइटमेंट हवी आहे, तर मग फिरायला निघा. पण नेहमीसारखं भटकून भटकून पर्यटनस्थळं पहायचा विचार करत असाल, तर जरा थांबा...काही हटके करण्याचा विचार करा. टेन्टमध्ये राहाणं, कँम्प फायर आणि जोडीला साहसी खेळ असतील तर तुमच्या प्रवासाचा आनंद नक्कीच द्विगणित होईल. आपल्याकडे अशी अनेक ठिकाणं आहेत, जी आज केवळ कँम्पिंगसाठीच प्रसिद्ध आहेत.
1.ॠषीकेश
तरु णांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेलं हे कँम्पिंग डेस्टिनेशन आहे. उत्तराखंडमधल्या या ठिकाणी तरूणाई इथल्या साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी आवर्जून येते. इथल्या पर्वरांगांच्या पायथ्याशी किंवा गंगेच्या तीरावर तुम्हाला राहण्यासाठी तंबूही मिळतात. गंगेच्या पाण्याचा आवाज आणि गार वारा, तंबूत घालवेली ती रात्र तुम्ही कधीच विसरणार नाही. रिव्हर राफ्टिंग हा इथला सगळ्यांत लोकप्रिय असा अडव्हेंचर स्पोर्ट आहे.
6.कूर्ग
भारताचं स्कॉटलंड म्हणून ओळखलं जाणारं हे टुमदार हिलस्टेशन तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्याचा एक वेगळाच आनंद देतं. चहा-कॉफीच्या मळ्यातून जाणारे रस्ते आणि पश्चिम घाटाचं अद्भुत सौंदर्य यांमुळे तुमच्या कँम्पिंगची मजाच डबल होते. बेट्टागिरीच्या जवळ मस्त तंबू टाकायचे आणि इथल्या निसर्गाशी एकरु प होऊन जायचं.
7.अंजुना बीच गोवा
गोव्यातील प्रत्येक बीचची स्वत:ची अशी खासियत असली तरी कँम्पिगसाठीचं उत्तम ठिकाण म्हणजे अंजुना बीचच.
8.जैसलमेर
राजस्थानच्या वाळंवटात राहण्याचा, तिथल्या संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर जैसलमेरला जायलाच पाहिजे. इथल्या सेराई लक्झरी कँम्पमध्ये तुम्हाला राजस्थानची झलक पहायला मिळते. सोनेरी वाळूतल्या तंबूंमध्ये राहताना राजस्थानी जेवण, संगीत यांचा आस्वाद घेता येतो.