यादगार हनिमूनसाठी बेस्ट ठरू शकेल 'हे' डेस्टिनेशन, पुन्हा पुन्हा जायची होईल इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:48 PM2020-01-22T15:48:43+5:302020-01-22T16:47:32+5:30
जर तुम्ही बरेच दिवस आपल्या कुटूंबासोबत किंवा पार्टनर सोबत कुठे फिरायला गेला नसाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.
जर तुम्ही बरेच दिवस आपल्या कुटूंबासोबत किंवा पार्टनर सोबत कुठे फिरायला गेला नसाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत तसंच कुटूंबासोबत सुद्धा पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.सध्या लग्नाचा सिजन सुरू झाला आहे. अनेकजण हनिमूनला जाण्यासाठी खास ठिकाणाच्या शोधात आहेत. मालदिव हे पर्यटकांना फिरायला जाण्यासाठी सुंदर ठिकाण आहे.
गोव्यानंतर अनेक लोक या ठिकाणाला पसंती देतात. मालदीव एअरपोर्टला पोहोचल्यानंतर तुम्हाला समुद्र दिसायला सुरूवात होईल. हे खूप शांत आणि सुरक्षित ठिकाण आहे. जर तुम्ही फिरायला जाण्यासाठी ठिकाण शोधत असाल तर मालदीवचे आयलॅंण्ड आजच बूक करा. या ठिकाणी वॉटर स्पोर्टस पासून फिरण्यासाठी सुंदर ठिकाणांचा समावेश असेल. या ठिकाणी तुम्हाला स्पा पॅकेज सुद्दा उपलब्ध असेल. वॉटर अॅक्टिविटीज स्नॉकर्लिंग, तसचं खाण्यापिण्याचे शौकिन असलेले लोकं या ठिकाणी स्थानिक खाद्याचा आनंद घेऊ शकतात.
ज्यांना फोटोग्राफी करण्याची आवड आहे असे लोकं या ठिकाणी मनसोक्त वेगवेगळे फोटोज् काढू शकतात. याठिकाणी जवळपास १२०० बेट आहेत. या ठिकाणंच्या निळ्या पाण्याच्या समुद्राला पाहण्यासाठी लांबून लोकं येत असतात. या ठिकाणी तुम्ही सागरी सफरीचा आनंद घेऊ शकता.
या ठिकाणी तुम्ही पर्स सी शेल्सपासून तयार करण्यात आलेले नेकलेस खरेदी करू शकता. शक्यतो पाण्याच्या बॉटल्स घेत असताना तुम्ही एअरपोर्टवरून खरेदी करा. कारण रिजॉर्टवरून खरेदी केल्यास जास्त खर्च होण्याची शक्यता असते. भारतीय पर्यटकांना मालदीवला व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळते.
मालदीवला जाण्यासाठी आधी व्हिसा तयार करण्याची गरज भासत नाही. मालदीवला पोहोचल्यावर पासपोर्ट दाखवून तुम्ही व्हिसा मिळवू शकता. मालदीवकडे पर्यटकांचा ओढा वाढण्याचं हेही एक कारण आहे. मालदीवचे समुद्र किनारे अत्यंत स्वच्छ असल्यानं तिथं पोहण्याचा पुरेपूर आनंद तुम्ही लुटू शकता. तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वॉटर स्पोर्ट्स आणि अंडर वॉटर अॅक्टिव्हिटीज देखील तिथं आहेत.
नोकू मालदिव
या ठिकाणी नोकू मालदीव आहे. या बेटाला कुदा फनफारू असं सुद्धा म्हणतात. या ठिकाणी जगप्रसिध्द अनेक मोठे मासे पाहण्यासारखे आहेत. याठिकाणी तुम्हाला नोकू स्पाचा अनोखा आनंद घेता येईल.
इरूवेली मालदिव
खूप वेगळं आणि शांत निळ्या पाण्याचं शांत असे हे बेट आहे. या ठिकाणी राहण्यासाठी ज्या रूम्स आहोत त्या खूप भव्य आहेत. तसचं पाण्यातील जैवविविधता पाहण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल.
व्हेल व डॉल्फिन
(image credit- ww.kouni.co.uk)
जगातले सगळ्यात मोठे मासे व्हेल डॉल्फिन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मालदिवची गणती व्हेल आणि डॉल्फिनचे दृश्य पाहण्यासाठी असेलल्या जगातल्या पाच देशांमध्ये होते. ( हे पण वाचा-वाईल्ड लाईफचा आनंद घेण्यासाठी 'ही' ठिकाणं आहेत खास, एकदा जाऊन तर बघा...)
या ठिकाणी कसं जालं
( image credit-www.travelpulse.com)
केऱळच्या तिरूवनंतपुरम येथून विमान उड्डान घेईल, दिल्ली वरून जाण्याचा तुमचा विचार असेल तर कोलंबो वरून तसंच काही आंतरराष्ट्रीय विमाळतळ घेत विमान मालदीवला पोहोचेल. या ठिकाणी जाण्याचे रेट सुद्धा फार जास्त नाहीत.( हे पण वाचा-हनिमूनसाठी बेस्ट ठरेल 'रोमॅन्टिक आयलॅण्ड', पार्टनरला खूश करण्यासाठी बेस्ट ऑप्शन)