मनाली ट्रिप:-चार दिवसात खूप काही!
By Admin | Published: April 28, 2017 05:01 PM2017-04-28T17:01:40+5:302017-04-28T17:01:40+5:30
शुभ्र; खळाळती नदी, हिमाच्छादित शिखरं, गर्द हिरवाईतल्या पायवाटेनं मारलेला फेरफटका...हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मनालीला चार दिवसांची सहल नक्कीच काढू शकता.
-अमृता कदम
एप्रिल-मे महिन्यात फिरायला जायचंय, खूप मोठी सुटी नाहीये अगदी सहा-सात दिवसांचाच वेळ आहे अशावेळी नेमकी कुठे आणि कशी ट्रीप प्लॅन करायची असा प्रश्न पडू शकतो. शुभ्र; खळाळती नदी, हिमाच्छादित शिखरं, गर्द हिरवाईतल्या पायवाटेनं मारलेला फेरफटका...हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मनालीला चार दिवसांची सहल नक्कीच काढू शकता.
खरं तर मनालीला थंडीमध्ये जाणं केव्हाही चांगलं, असं अनेक जण तुम्हाला सांगतील, सुचवतील. कारण इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे हिमवृष्टी. पण तरीही बर्फ वितळण्याच्या या काळातही मनालीचं सौंदर्य उणावत नाहीच, पण उन्हाच्या रखरखाटापासून शांत विसावाही मिळतो. शिवाय याच काळात इथे वेगवेगळ्या स्नो आणि वॉटर स्पोर्टसचाही आनंद घेता येतो.
मनालीमध्ये चार दिवस तुम्ही काय काय पाहा हे सांगण्याआधी एक महत्त्वाची सूचना. मनालीमध्ये पायीच फिरा. इथल्या हवेशी, निसर्गाशी एकरु प होऊन त्याचा आनंद घ्यायचा असेल तर एसी गाडीच्या खिडकीमधून मनाली दर्शन अजिबात करु नका.